मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूची गर्लफ्रेंड ठरतेय ‘गरीबांची मसीहा’, काय करते काम?

मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर चार विकेटने विजय मिळवला. या विजयात विल जॅक्सचा मोठा वाटा होता. त्याने उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी केली. विल जॅक्सची गर्लफ्रेंड एना ब्रामवेल ही एक परोपकारी आहे जी गरिबांना मदत करते.

मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूची गर्लफ्रेंड ठरतेय गरीबांची मसीहा, काय करते काम?
Will Jacks Ana Brumwell
| Updated on: Apr 18, 2025 | 3:46 PM

मुंबई इंडियन्सने काल सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चार विकेट राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सला हैदराबादने विजयासाठी 163 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मुंबई इंडियन्सने 19 व्या षटकात हे लक्ष्य पार केले. या विजयाचा शिल्पकार विल जॅक्स ठरला. त्याने कालच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. विल जॅक्स गोलंदाजीदरम्यान १४ धावा देत हैदराबादचे २ महत्त्वपूर्ण विकेट घेतले. तर फलंदाजी करताना २६ चेंडूत ३६ धावांची तुफानी खेळी केली. यामुळे विल जॅक्स मुंबई इंडियन्ससाठी खऱ्या अर्थाने तारणहार ठरला. पण तुम्हाला माहितीये का, विल जॅक्सनची गर्लफ्रेंड एना ब्रमवेल खऱ्या अर्थाने गरीबांची मसीहा म्हणून ओळखले जाते.

विल जॅक्स आणि एना ब्रमवेल हे दोघे १४ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. सुरुवातीला ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र आता या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. एना ब्रमवेलच्या ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून कायमच त्या दोघांचे एकत्र फोटो पहायला मिळतात.

अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत करते काम

एना ब्रमवेलने ब्रिस्टल विद्यापीठातून बायोमेडिकल सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. यात तिने पदवी घेतली आहे. ती एक समाजसेविका (फिलांथ्रोपिस्ट) देखील आहे. गरीब लोकांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या व्यक्तीला फिलांथ्रोपिस्ट असे म्हणतात. विल जॅक्सची गर्लफ्रेंड यात अग्रेसर आहे. ती अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत जोडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती फिलिपिन्समध्ये गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करते.

दोघांनी खरेदी केले नवीन घर

एना ब्रमवेल तिच्या बॉयफ्रेंड विल जॅक्सच्या प्रत्येक आनंदात सहभागी होताना दिसते. गेल्यावर्षी एना ब्रमवेल आणि विल जॅक्स या दोघांनी मिळून नवीन घर घेतले. यानंतर त्यांनी पिझ्झा पार्टी करून याचा आनंद साजरा केला. त्यानंतर दोघांनी गेल्यावर्षीचा ख्रिसमस देखील याच नवीन घरातच साजरा केला होता.

एना ब्रमवेल प्रचंड लोकप्रिय

एना ब्रमवेलला आयपीएल सामन्यांदरम्यान विल जॅक्सला प्रोत्साहन देताना दिसते. विल जॅक्स हा गेल्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या टीममध्ये होता. तेव्हा एना ब्रमवेलला बरीच लोकप्रियता मिळाली होती. यंदाच्या आयपीएल हंगामातही एना ब्रमवेल आपल्या अंदाजाने कॅमेऱ्याचे लक्ष वेधून घेतले आहे.