LSG vs PBKS : पंजाबचा लखनौवर एकतर्फी विजय, पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप, मुंबईला फायदा

LSG vs PBKS Points Table Ipl 2025 : पंजाब किंग्सच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. पंजाबच्या विजयाने लखनौला झटका लागला आहे. तर मुंबईला पंजाबच्या विजयामुळे फायदा झालाय.

LSG vs PBKS : पंजाबचा लखनौवर एकतर्फी विजय, पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप, मुंबईला फायदा
Ipl 2025 LSG vs PBKS Points Table
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 01, 2025 | 11:26 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात पंजाब किंग्सने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात सलग दुसरा विजय मिळवला आहे. पंजाबने मंगळवारी 1 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सवर एकतर्फी विजय मिळवला. लखनौने पंजाबला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 22 बॉलआधी 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. पंजाबने 16.2 ओव्हरमध्ये 177 रन्स केल्या. पंजाबच्या विजयात प्रभसिमरन सिंह, श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा या त्रिकुटाने प्रमुख योगदान दिलं. प्रभसिमरन याने 69 धावा केल्या. तर श्रेयस आणि नेहल या जोडीने नाबाद खेळी करत पंजाबला जिंकवलं. श्रेयसने 52 आणि नेहलने 43 रन्स केल्या. पंजाबला सलग दुसऱ्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल

लखनौ विरुद्ध पंजाब सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलचं चित्रच बदललं आहे. पंजाबने विजयासह 3 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. पंजाब थेट पाचव्या क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानी पोहचली आहे. पंजाबचा नेट रनरेट हा आता +1.485 असा आहे. पंजाबच्या विजयामुळे दुसऱ्या स्थानी असलेल्या दिल्लीची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

लखनौ टॉप 5 मधून आऊट

लखनौ सुपर जायंट्सला पराभवामुळे मोठा झटका लागला आहे. लखनौ सुपर जायंट्स थेट टॉप 5 मधून बाहेर झाली आहे. लखनौची 3 स्थानांनी घसरण झालीय. लखनौ तिसऱ्या क्रमांकावरुन सहाव्या स्थानी फेकली गेली आहे. गुजरात चौथ्या स्थानी कायम आहे.

पंजाबचा विजय, मुंबईचा फायदा

दरम्यान पंजाबच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सचा फायदा झाला आहे. पंजाबमुळे मुंबई टॉप 5 मध्ये आली आहे. मुंबईला एका स्थानाचा फायदा झाला आहे. मुंबई सहाव्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानी आली आहे. तर आरसीबी सलग 2 विजयांसह पहिल्या स्थानी कायम आहे. पंजाबनेही 2 सामने जिंकलेत. मात्र पंजाबच्या तुलनेत आरसीबीचा नेट रनरेट सरस आहे. आरसीबीचा नेट रनरेट +2.266 असा आहे.

पंजाबची पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी

लखनौ सुपर जायंट्स : मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश सिंग राठी, शार्दुल ठाकूर, आवेश खान आणि रवी बिश्नोई.

पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग.