
पंजाब किंग्सने सनरायजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात त्यांच्याच पॅटनर्ने जोरदार बॅटिंग करत धांवाचा डोंगर उभारला आहे. पंजाबने सलग 4 सामने गमावणाऱ्या सनरायर्स हैदराबादसमोर 246 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाबने सनरायजर्स हैदराबादच्या घरच्या मैदानात 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 245 धावा केल्या. हैदराबादला गेल्या 4 सामन्यांपासून काहीही करता आलेलं नाही. मात्र त्यांच्या ताफ्यात एकसेएक स्फोटक फलंदाज आहेत. तसेच कमबॅकसाठी एक सामना पुरेसा आहे. त्यामुळे हैदराबादचे फलंदाज हे आव्हान पूर्ण करत पराभवाची मालिका खंडीत करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. श्रेयसचा हा निर्णय योग्य ठरला. पंजाबसाठी एकूण 8 जणांनी बॅटिंग केली. त्यापैकी 5 जणांनी तडाखेदार बॅटिंग केली. श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसने 36 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरसह 82 रन्स केल्या. प्रभसिमरन सिंह याने 23 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 42 धावा केल्या. प्रियांश आर्याने 13 चेंडूत 276.92 च्या स्ट्राईक रेटने 36 धावा जोडल्या. प्रियांशने या खेळीत 4 सिक्स आणि 2 फोर लगावले. नेहल वढेरा याने 27 धावांची भर घातली.
शशांक सिंह 2 आणि ग्लेन मॅक्सवेल 3 धावा करुन आऊट झाले. त्यानंतर मार्कस स्टोयनिसने मार्को जान्सेनच्या सोबतीने फिनिशिंग टच दिला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धमाका केला. स्टोयनिसने शेवटच्या ओव्हरमध्ये षटकारांचा चौकार लगावला. स्टोयनिसने फक्त 11 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 1 फोरसह 309.09 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 34 धावा केल्या. तर मार्को जान्सेन 5 धावांवर नाबाद परतला. हैदराबादसाठी हर्षस पटेल याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर एशान मलिंगा याने दोघांना आऊट केलं.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी आणि एशान मलिंगा.
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल.