AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: मुंबई-कोलकाता सामन्यात ‘प्रेम फुललं’ MI च्या चाहत्याने केलं केकेआरच्या फॅनला प्रपोज Video

आयपीएल 2026 स्पर्धेतील दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला. हा सामना मुंबईने जिंकला. पण दुसरीकडे, प्रेक्षक गॅलरीत एक प्रेमकथा फुलली. मुंबई इंडियन्सच्या चाहत्याने केकेआरच्या फॅन्सला प्रपोज केलं.

IPL 2026: मुंबई-कोलकाता सामन्यात 'प्रेम फुललं' MI च्या चाहत्याने केलं केकेआरच्या फॅनला प्रपोज Video
IPL 2026: मुंबई-कोलकाता सामन्यात 'प्रेम फुललं' MI च्या चाहत्याने केलं केकेआरच्या फॅनला प्रपोज VideoImage Credit source: KKR Twitter
| Updated on: Mar 30, 2026 | 8:49 PM
Share

आयपीएल स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांनी 200 पार धावा केल्या. त्यामुळे मैदानात चौकार आणि षटकारांची आतषबाजी झाली हे सांगायला नको. कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 220 धावा केल्या आणि विजयासाठी 221 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 6 गडी राखून पूर्ण केलं. या सामन्यात मैदानात प्रत्येक चेंडूनंतर क्रीडाप्रेमींची हृदयाची धाकधूक वाढत होती. दुसरीकडे, प्रेक्षक गॅलरीत एक प्रेमकथा पुढे सरकत होती. मुंबई इंडियन्सच्या चाहत्याने प्रपोजसाठी हा दिवस निवडला. गर्लफ्रेंड केकेआरची समर्थक होती. दोघंही आपआपल्या आवडत्या फ्रेंचायझीच्या जर्सीत होते. त्यामुळे दोन्ही संघ मैदानात लढत असताना केलेलं प्रपोज उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील.

व्हायरल व्हिडीओनुसार, दोघंही प्रेक्षक गॅलरीत उभे होते. मैदानातील उपस्थित लोकं सामना पाहताना हे दोघं काय करत आहेत, याकडे बारकाईने पाहत होते. या दृष्य कॅमेऱ्यात चित्रित केलं गेलं. मुंबई इंडियन्सचा चाहता गुडघ्यावर बसला आणि प्रपोज करणार तितक्यात ट्विस्ट आला. त्याच्या हातात असलेली प्रपोज अंगठी तोल गेल्याने पडली. त्यामुळे काही सेकंद अंगठी शोधण्यात गेली. त्यानंतर अंगठी मिळाली आणि तिच्या बोटात घातली. तिनेही त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि होकार दर्शवला. बोटात अंगठी घालताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. 24 सेकंदाची ही क्लिप वेगाने व्हायरल होत आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला “शी प्रोथोम भालोबाशेर फीलिंग” असे कॅप्शन दिले आहे. हा एक बंगाली वाक्प्रचार असून त्याचा अर्थ “पहिल्या प्रेमाची भावना” असा होतो. केकेआरने हा व्हिडिओ शेअर केला आणि चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वीही काही जणांनी मैदानात प्रपोज केलं आहे. त्याचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे आता जोडपे ही संधी साधून आपल्या प्रेमाची कबुली देत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...