AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : ऋतुराजसोबत आयुष-संजूपैकी ओपनिंगला कोण? कॅप्टनने नाव सांगून विषय संपवला

Ruturaj Gaikwad On Csk Opening Pair IPL 2026 : आयपीएल स्पर्धेच्या इतिहातील यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सची 19 व्या मोसमासाठी सलामी जोडी निश्चित झाली आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड यानेच याबाबत माहिती दिली आहे.

IPL 2026 : ऋतुराजसोबत आयुष-संजूपैकी ओपनिंगला कोण? कॅप्टनने नाव सांगून विषय संपवला
Csk Ruturaj Gaikwad IPL 2026Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 26, 2026 | 4:46 PM
Share

आयपीएलच्या 19 व्या मोसमाचं काउंटडाऊन सुरु झालंय. 19 व्या मोसमाला शनिवार 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेची 8 मार्च रोजी सांगता झाली. टीम इंडिया न्यूझीलंडला पराभूत करुन वर्ल्ड चॅम्पियन ठरली. त्यानंतर तब्बल 20 दिवसांनी भारतीय खेळाडू आणि अपवाद वगळता इतर सर्व क्रिकेटपटू हे आयपीएल स्पर्धेनिमित्ताने एक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या 19 व्या पर्वातील पहिल्या टप्प्यात एकूण 16 दिवस 20 सामने होणार आहेत.

चेन्नई सुपर किंग्ससाठी ओपनिंगला कोण खेळणार?

कर्णधार, एकूण 10 संघ आणि त्यांच्या चाहत्यांना पहिल्या सामन्याची प्रतिक्षा आहे. तसेच या पर्वाच्या काही तासांआधी आता महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर मिळायला लागली आहेत. राजस्थान रॉयल्ससाठी खेळणारा संजू सॅमसन यंदा चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. संजू राजस्थानसाठी ओपनिंग करायचा. त्यामुळे संजू चेन्नईकडून कोणत्या स्थानी खेळणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा होती. अखेर या बहुप्रतिक्षित प्रश्नाचं उत्तर स्वत: कर्णधार ऋतुराज गायकवाड याने स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना दिलं आहे.

आयुष-ऋतुराज? ऋतुराज-संजू की संजू-आयुष?

ऋतुराजला सीएसकेच्या ओपनिंग जोडीबाबत प्रश्न करताना 3 पर्याय देण्यात आले. ऋतुराजने त्यापैकी एकाची निवड केली जो ओपनिंग करणार आहे. तसेच कॅप्टनला संजू आणि आयुष ओपनिंग करणार? संजू आणि ऋतुराज सलामीला खेळताना पाहायला मिळणार? तसेच ऋतुराज आणि आयुष चेन्नईसाठी सुरुवात करणार का? असे 3 प्रश्न करण्यात आले. ऋतुराजने यापैकी प्रश्न क्रमांक 2 ची निवड केली. अर्थात ऋतुराज आणि संजू सीएसकेसाठी ओपनिंग करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सीएसके टीममध्ये स्वत: ऋतुराज आणि आयुष म्हात्रे हे दोघे ओपनर आहेत. त्यामुळे नव्याने आलेल्या संजू कोणत्या भूमिकेत दिसणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना होती. तसेच ऋतुराजने या दरम्यान बोलताना प्रतिस्पर्धी संघ या जोडीचा सामना करण्यासाठी तयार असल्याचंही म्हटलं.

कॅप्टन ऋतुराज गायकवाड काय म्हणाला?

संजू सॅमसन ओपनिंगसाठी सज्ज

दरम्यान संजूचं या मोसमातून सीएसकेसाठी पदार्पण होणार आहे. विशेष म्हणजे संजू सीएसकेसाठी ओपनर म्हणून सुरुवात करणार आहे. संजूने नुक्त्यात झालेल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे संजू हाच तडाखा कायम ठेवण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल