AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचं मोठं नुकसान, 11.75 कोटींची गुंतवणूक पाच सामन्यात वाया

आयपीएल स्पर्धा आता हळूहळू पुढे सरकत आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. असं असताना काही संघांची धाकधूक वाढली आहे. असंच काहीसं दिल्ली कॅपिटल्स संघाचं झालं आहे.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचं मोठं नुकसान, 11.75 कोटींची गुंतवणूक पाच सामन्यात वाया
IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचं मोठं नुकसान, 11.75 कोटींची गुंतवणूक पाच सामन्यात वायाImage Credit source: delhi capital twitter
| Updated on: Apr 07, 2026 | 8:48 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सने अद्याप एकदाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षात फक्त प्रयत्नच सुरू आहेत. मागच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर गाडी रूळावरून घसरली आणि प्लेऑफमध्ये जागा मिळवता आली नाही. यंदाही दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरूवात केली आहे. पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आहे. या सामन्यात स्टार गोलंदाज नसताना दिल्ली कॅपिटल्सने हा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क अजूनही संघात रूजू झालेला नाही. अशा स्थितीत दिल्ली कॅपिटल्सची धाकधूक वाढली आहे. कारण दिल्ली कॅपिटल्सची गाडी विजयी रूळावरून घसरू नये यासाठी चांगल्या गोलंदाजाची गरज आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. मिचेल स्टार्क आणखी तीन सामन्यांना मुकणार आहे. आधीच दोन सामने खेळला नाही. त्यात आणखी तीन सामन्यात गैरहजर असणार आहे.

एशेज कसोटी मालिका 2025-2026 स्पर्धेत मिचेल स्टार्कच्या खांद्याला आणि कोपराला दुखापत झाली होती. त्याच्यावर सध्या ऑस्ट्रेलियात उपचार सुरू आहेत. तसेच पूर्ण बरा झाल्याशिवाय मैदानात उतरणार नाही. अशा स्थितीत पुढच्या तीन सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मिचेल स्टार्क 8 एप्रिलला गुजरात टायटन्स, 11 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि 18 एप्रिलला आरसीबीविरुद्दच्या सामन्यात खेळणार नाही. मिचेल स्टार्क पूर्णपणे बरा झाल्यावरच 21 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळेल. याचा अर्थ मिचेल स्टार्कचे आयपीएलमध्ये खेळणं अजूनही निश्चित नाही.

मिचेल स्टार्कला संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने 11.75 कोटी मोजले होते. पण साखळी फेरीतील निम्म्या सामन्यात खेळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचं मोठं नुकसान होत आहे. त्याच्या गैरहजेरीत मुकेश कुमार, टी. नटराजन आणि लुंगी एनगिडी वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळत आहेत. पण मिचेल स्टार्कची उणीव कुठे ना कुठे भासत आहे. मिचेल स्टार्क संघात असला तर डेथ ओव्हरमध्ये एक प्रभावी गोलंदाज ताफ्यात असेल.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल