AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs PBKS सामना पावसामुळे रद्द, पण कोलकात्याची मोठी चूक उघड! अजिंक्य रहाणेने काय केलं?

आयपीएल 2026 स्पर्धेतील 12वा सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात फक्त 22 चेंडूंचा खेळ झाला आणि पावसामुळे सामना थांबवण्यात आला. असं असताना केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेची मोठी चूक समोर आली आहे.

KKR vs PBKS सामना पावसामुळे रद्द, पण कोलकात्याची मोठी चूक उघड! अजिंक्य रहाणेने काय केलं?
KKR vs PBKS सामना पावसामुळे रद्द, पण कोलकात्याची मोठी चूक उघड! अजिंक्य रहाणेने काय केलं?Image Credit source: KKR Twitter
| Updated on: Apr 07, 2026 | 8:13 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आणि एक गुण पदरी पडली. तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात 22 चेंडूंचा सामना झाला आणि केकेआरने 2 गडी गमवून 25 धावा केल्या. पण पावसाच्या व्यत्यय आल्याने हा सामना काही पुढे सरकू शकला नाही. खरं तर या सामन्यात आघाडीचे दोन फलंदाज झटपट बाद झाल्याने केकेआरवर दबाव वाढला होता. पण नाणेफेकीचा कौल जिंकून केकेआरने फलंदाजी घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. कारण दुसऱ्या डावातील दव फॅक्टर पाहता हा निर्णय चुकीचा होता. पण अजिंक्य रहाणेने धाडसी निर्णय घेतला असं तेव्हा अनेकांनी सांगितलं. पण हा सामना रद्द झाल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या निर्णयाची पोलखोल झाली आहे.

नेमकं काय चुकलं?

अजिंक्य रहाणेने फलंदाजीत चांगली कामगिरी केली असली तरी, त्याच्या निर्णयक्षमतेवर आणि नेतृत्व कौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज असताना प्रथम फलंदाजी स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ढगाळ वातावरणात पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी पाठवून त्यांच्यावर दबाव आणण्याची उत्तम संधी होती. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारतो, पण अजिंक्य रहाणेने त्याच्या उलट केलं. प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि 22 चेंडूत निर्णय फसल्याचं दिसलं. खरं तर अशा स्थितीत धावांचा पाठलाग करणं सोपं जातं. कारण पाऊस पडला तर टार्गेट परिस्थितीनुसार बदललं जातं. त्यात गोलंदाजांना गोलंदाजी करणं कठीण जातं.

काय म्हणाला एरोन फिंच?

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एरोन फिंच म्हणाला की, ‘एक गोष्ट तुमच्या हातात असते ती म्हणजे नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे. खेळपट्टी एक दिवस झाकून ठेवल्यानंतर नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेणे आणि त्यातही पावसाची शक्यता आहे हे माहीत असताना असं आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. याचा काहीच अर्थ लागत नाही. तुम्ही त्या निर्णयापर्यंत कसे पोहोचता? ही धोक्याची घंटा आहे. फक्त 25 धावांत दोन गडी बाद होण्याचा हा प्रश्न नाही. त्यांनी मुळात फलंदाजी करायलाच नको होती.’ कर्णधार योग्य विचार करत नाहीये आणि हे संघासाठी चांगले लक्षण नाही, असंही फिंच म्हणाला.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल