AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेजस ठाकरेंनी सुबानसिरी खोऱ्यात शोधली दुर्मिळ वनस्पती; नव्या प्रजातीला दिलं आयुष्यातील खास व्यक्तीचं नाव

tejas Thackeray discover new plant : तेजस ठाकरे यांनी अरुणालच प्रदेशच्या जंगलात वनस्पतीची नवी प्रजाती शोधली आहे. त्यानंतर त्यांनी प्रजातीला नाव देखील खास दिलं आहे.

तेजस ठाकरेंनी सुबानसिरी खोऱ्यात शोधली दुर्मिळ वनस्पती; नव्या प्रजातीला दिलं आयुष्यातील खास व्यक्तीचं नाव
| Updated on: Jul 11, 2026 | 9:58 AM
Share

उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पतींचे संशोधन व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशन’च्या माध्यमातून तेजस ठाकरे यांनी आणखी एक महत्त्वाचे संशोधन केलं. हिमालयात सापडणाऱ्या ‘मिट्रिफोरा’ या वनस्पतीची नवी प्रजात शोधून काढण्यात फाऊंडेशनला यश आलंय. अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी खोऱ्यातील दापोरिजो परिसरात मिट्रिफोराची नवी प्रजात सापडली आहे. यासंदर्भातील संशोधन ‘फेडेज रिपर्टोरियम’ या सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालंय.

मिट्रिफोराच्या नव्या वनस्पतीवरील फुलाला रश्मी ठाकरे यांच्या नावावरून ‘मिट्रिफोरा रश्मी’ असे नाव देण्यात आले आहे. ‘फेडेज रिपर्टोरियम’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात याबाबत विशेष उल्लेख करण्यात आला आहे. वनसंपदा आणि वन्यजीव संशोधनात रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनच्या पाठीशी उभ्या राहिल्या, असे या लेखात नमूद केलंय.

घनदाट आढळली नवी प्रजाती 

तेजस ठाकरे यांना वन्यजीव, निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रात विशेष रुची आहे. त्यांनी याआधी देखील अनेक दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यांना ही दुर्मिळ प्रजाती अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी खोऱ्यातील घटदाट जंगलात सापडली आहे. या जंगलात एका लहान झाडाची नवीन प्रजाती आढळली. ही प्रजाती सीताफळ कुळातील ‘मिट्रेफोरा’ या वर्गातील आहे. या नव्या प्रजातीचे नामकरण रश्मी ठाकरे यांच्या नावावरून ‘मिट्रेफोरा रश्मिया’ असे करण्यात आलं आहे.

रश्मी ठाकरे यांना नवी प्रजाती समर्पित

तत्पूर्वी, रश्मी ठाकरेंनी तेजस यांच्या बालपणापासून निसर्गाविषयीची उत्सुकता जोपासली आहे. तसेच त्यांची पर्यावरण विषयातील आवड वाढवण्यास मदत केली. ठाकरे वाईल्डलाइफ फाऊंडेशनच्या स्थापनेत आणि वाढीसाठी पाठिंबा देणाऱ्या रश्मी ठाकरे यांना ही प्रजाती समर्पित करण्यात आली आहे. या दुर्मिळ प्रजातीचे एकच झाड अस्तित्वात असल्याचे समोर आलं आहे. पूर्व हिमालयीन जैवविविधता हॉटस्पॉट क्षेत्रातील मिट्रेफोरा वर्गातील ही केवळ दुसरी प्रजाती असल्याचे समजतंय. या झाडावर नर आणि उभयलिंगी प्रकारचे फुले येणाऱ्या वर्गातील ही एकमेव प्रजाती आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ