AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: PF खात्यावर 7 लाखांचा विमा फ्री, आता अजून 1 लाखांचा फायदा, जाणून घ्या

PF EDLI Scheme 2026: EPFO ने देशातील सात कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन नियमानुसार, आता पीएफ खात्यावर 7 लाख रुपयांचा मोफत विमाच नाही तर 1 लाखांचा अतिरिक्त फायदाही मिळेल. 29 जूनपासूनही नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. काय आहे याविषयीची मोठी अपडेट?

EPFO: PF खात्यावर 7 लाखांचा विमा फ्री, आता अजून 1 लाखांचा फायदा, जाणून घ्या
PF खात्यावर 7 लाखांचा विमा फ्री
| Updated on: Jul 11, 2026 | 9:57 AM
Share

PF EDLI Scheme 2026: देशातील 7 कोटींहून अधिक कर्मचार्‍यांना ईपीएफओने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत पाच दशकांची जुनी व्यवस्था पूर्ण बदलली आहे. कर्मचारी ठेव-संलग्न विमा योजना 2026 (EDLI Scheme 2026) अधिसूचीत करण्यात आली आहे. या 29 जूनपासून संपूर्ण देशात ही नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यातंर्गत यापूर्वीचा 7 लाख रुपयांचा मोफत विमा लागू आहेच. त्यासोबत आता पीएफ रक्कमेवर आधारीत 1 लाख रुपयांच्या अतिरिक्त विम्याचा लाभ पण देण्यात येणार आहे.

PF बँलेन्सवर थेट लाभ

नवीन EDLI 2026 योजनेचे सर्वात मोठे आकर्षण हे पीएफ बँलन्सशी संबंधित नवीन विमा फायदा हा आहे. नवीन नियमानुसार, जर एखाद्या ईपीएफ सदस्याचे निधन झाले. तर त्याच्या वारसदाराच्या बँका खात्यात संपूर्ण रक्कम जमा होईल. एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ही त्याच्या खात्यात जमा होतील. जर कर्मचाऱ्यांचे सरासरी पीएफ बँलन्स 50,000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर कुटुंबाला 50,000 रुपयांची निश्चित रक्कम देण्यात येईल. त्यानंतरच्या रक्कमेचा 40% टक्के भाग जोडल्या जाईल. नवीन तरतूदीनुसार, त्याचा लाभ किमान एक लाख रुपयांपर्यंत आहे.

मोफत विम्याचा लाभ कायम

सरकारने नवीन दुरुस्ती केलेली असली तरी जुन्या योजनेतील अनेक चांगल्या तरतुदी कायम ठेवल्या आहेत. त्याचे फायदे पीएफ सदस्यांना यापुढेही मिळत राहतील. एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाले तर यापूर्वी त्याने सलग 12 महिन्यांपर्यंत काम करणे आवश्यक होते. त्याआधारेच त्याच्या वारसांना पीएफ रक्कमेवरील विम्याचा लाभ देण्यात येत होता. या विम्याची गणना ही कर्मचाऱ्याच्या सरासरी वेतनाच्या 35 पट आणि पीएफ बँलन्सच्या 50% वाटा गृहीत धरून करण्यात येत होती. यातंर्गत किमान 2.5 लाख रुपये आणि कमाल 7 लाख रुपयांचा दावा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. काही विशिष्ट परिस्थितीत विम्याच्या लाभात 20% अतिरिक्त वाढीचा पर्यायही कायम ठेवला आहे.

नोकरी सुटल्यानंतरही 6 महिन्यानंतर विम्याचा लाभ

पीएफ योगदान बंद झाल्यानंतर विम्याचा क्लेम करताना कुटुंबियांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सरकारने आता ही अडचण दूर केली आहे. आता योगदानानंतरचा कालावधी वाढवण्यात आला आहे. जर ईपीएफ सदस्यांचा मृत्यू हा काम करताना झाला आणि पीएफ योगदान, कॉन्ट्रीब्युशन 6 महिन्यांच्या आत जमा झाले तर अशा मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला 7 लाख रुपयांच्या विम्यावर दावा दाखल करता येतो.

Follow Us