AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचे टेन्शन वाढले, भारत अमेरिकेच्या निशाण्यावर, थेट रशियाकडून तेल खरेदी आता..

रशिया आणि भारताची मैत्री अनेक वर्षांची आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारत आणि रशियाची मैत्री अमेरिकेला देखवत नाहीये. अमेरिकेने भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मोठा दबाव आणला. त्यातच आता अजून मोठा धक्का देण्याचे नियोजन अमेरिकेचे आहे.

भारताचे टेन्शन वाढले, भारत अमेरिकेच्या निशाण्यावर, थेट रशियाकडून तेल खरेदी आता..
Donald Trump Narendra Modi Vladimir Putin
| Updated on: Jul 11, 2026 | 9:50 AM
Share

रशियाकडून कच्चा तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवण्याच्या दिशेने अमेरिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. ज्याचा थेट परिणाम भारतावर होईल. कारण भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणारा जगातील नंबर दोनचा देश आहे. अमेरिकेतील चार प्रभावशाली सिनेटरनी रशियाविरोधात निर्बंध लादणारे नवीन विधेयक पुढे नेण्याचे जाहीर केले. त्याचा थेट परिणाम भारत, चीन यासारख्या देशांवर होऊ शकतो. भारत सध्या रशियाकडून मोठ्या संख्येने कच्चे तेल आयात करत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात होते. होर्मुज खाडी बंद होती. अशावेळीही रशियाने भारताला मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा केला. भारताच्या शेजारील देशाची स्थिती अशी होती की,  थेट लॉकडाऊन लावण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यावेळी भारताच्या पाठिशी खंबीरपणे रशिया उभा होता. भारत आणि रशियाची मैत्री कायमच अमेरिकेला खटकते.

रिपब्लिकन कायदेकर्ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय सहकारी लिंडसे ग्रॅहम व रॉजर विकर यांनी डेमोक्रॅटिक कायदेकर्ते रिचर्ड ब्लुमेन्थल आणि जीन शाहीन यांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे ही घोषणा केली. युक्रेनमधील नागरिकांवर रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाचे तेल आणि वायू खरेदी करून त्यांच्य अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आर्थिक दबाव टाकणे आवश्यक आहे.

सँक्शन्स रशिया ॲक्ट 2025 अंतर्गत रशियाकडून तेल, नैसर्गिक वायू, युरेनियम किंवा इतर पेट्रोलियम उत्पादने खरेदी करणाऱ्या देशांच्या वस्तू आणि सेवांवर अमेरिकेकडून आयात शुल्क म्हणजेच अर्थात टॅरिफ आकारण्याचा प्रस्ताव आला. या प्रस्तावात 500 टक्क्यापर्यंत टॅरिफ आकारण्याची परवानगी देण्यात आली.

त्यानंतर या प्रस्तावात काही बदल करण्यात आले असून शुल्कासंबंधीच्या तरतुदी काही प्रमाणात शिथिल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, आता रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसवण्यासाठी काही निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत. यासोबतच काही गोष्टींवर निर्बंध येऊ शकतात. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी कायम ठेवली तर भारतावर मोठी कारवाई अमेरिका करू शकते.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ