AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs MI: तिलक वर्माने 45 चेंडूत शतक ठोकत रचला विक्रम, हार्दिक पांड्याने डगआऊटमध्ये असा केला जल्लोष

आयपीएल 2026 स्पर्धेतील 30वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सला तिलक वर्माच्या शतकाने तारलं. त्याच्या शतकी खेळीने मुंबई इंडियन्सला 199 धावांपर्यंत मजल मारता आली. या शतकासह त्याने काही विक्रम रचले.

GT vs MI: तिलक वर्माने 45 चेंडूत शतक ठोकत रचला विक्रम, हार्दिक पांड्याने डगआऊटमध्ये असा केला जल्लोष
GT vs MI: तिलक वर्माने 45 चेंडूत शतक ठोकत रचला विक्रम, हार्दिक पांड्याने डगआऊटमध्ये असा केला जल्लोषImage Credit source: IPL Twitter
| Updated on: Apr 20, 2026 | 9:43 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने मुंबईच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान होतं.पम मुंबईला पावरप्लेमध्ये धक्क्यांवर धक्के बसले. सहा षटकात अवघ्या 46 धावांवर तीन गडी गमावले. सूर्यकुमार यादवची विकेट पडल्यानंतर तिलक वर्माला फलंदाजीला आला. त्यामुळे सावध आणि धावगती राखण्याचं आव्हान त्याच्या समोर होतं. त्याने नमन धीर सोबत चौथ्या विकेटसाठी डाव सावरला. या दोघांनी मिळून 40 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली. यात त्याने 18 चेंडूत 16 धावा केल्या. त्यामुळे त्याच्या फलंदाजीला फार काही धार असं दिसलं नाही. पण त्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीचा गिअर बदलला आणि आक्रमक फटकेबाजी केली.

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात तिलक वर्माने पहिल्या 10 चेंडूत 10 केल्या. पुढच्या 10 चेंडूत म्हणजेच 11 ते 20 चेंडूत 7 धावा केल्या. त्यानंतर 21 ते 30 चेंडूत म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील 10 चेंडूत 30 धावा काढल्या. चौथ्या टप्प्यातील 10 चेंडूत 33 धावा केल्या. तर 41 ते 45 म्हणजेच पाच चेंडूत 21 धावा केल्या. त्याने पहिल्या 22 चेंडूत 19 धावा केल्या आणि नंतरच्या 23 चेंडूत 82 धावांची खेळी केली. दुसऱ्या टप्प्यातील 23 चेंडूत त्याचा स्ट्राईक रेट हा 356.52 चा होता. तिलक वर्माने 45 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली.त्याने या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 224.44 चा होता. या शतकी खेळीपूर्वी पाच डावात त्याने 43 धावा केल्या होत्या. मात्र गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला लय गवसली आणि शतक ठोकलं. या शतकी खेळीनंतर हार्दिक पांड्याने डगआऊटबाहेर उड्या मारल्या.

तिलक वर्माचा विक्रम

  • गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचं दुसरं शतक आहे. यापूर्वी सूर्यकुमार यादनवे 2023 मध्ये 49 चेंडूत नाबाद 103 धावा ठोकल्या होत्या. तर तिलक वरम्माने 43 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली आहे.
  • आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून वेगवान शतक ठोकणाऱ्या सनथ जयसूर्यच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सनथ जयसूर्याने 45 चेंडूत चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 2008 मध्ये शतक ठोकलं होतं. तिलक वर्माने 2026 मध्ये अशीच कामगिरी तिलक वर्माने केली आणि त्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
  • दुसरीकडे डेथ ओव्हर म्हणजेच 16 ते 20 षटकातील 24 चेंडूत तिलक वर्माची बॅट चालली आणि पाचव्या स्थानावर विराजमान झाला. क्विंटन डिकॉकने 22 चेंडूत 71, टिम डेविडने 21 चेंडूत 69, आंद्रे रसेलने 20 चेंडूत 68, ऋषभ पंतने 23 चेंडूत 67, एबी डिव्हिलियर्सने 24 चेंडूत 65 आणि आता तिलक वर्माने 18 चेंडूत 65 धावा केल्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...