AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: दिग्गज फलंदाजांचा मोहम्मद शमीच्या गोलंदाजीसमोर थरथराट, आकडेवारीतून सर्वकाही स्पष्ट

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची धास्ती दिग्गज फलंदाजांनी घेतली आहे. कारण त्याचा रेकॉर्डच तसा आहे. केएल राहुलसह विराट कोहली, केन विल्यमसनसारख्या दिग्गज खेळाडूंना अडचणीत आणलं आहे. चला जाणून घेऊयात रेकॉर्ड

IPL 2026: दिग्गज फलंदाजांचा मोहम्मद शमीच्या गोलंदाजीसमोर थरथराट, आकडेवारीतून सर्वकाही स्पष्ट
IPL 2026: दिग्गज फलंदाजांचा मोहम्मद शमीच्या गोलंदाजीसमोर थरथराट, आकडेवारीतून सर्वकाही स्पष्टImage Credit source: PTI
| Updated on: Apr 02, 2026 | 6:42 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने पराभवाची धूळ चाखली. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. एकीकडे संघाचा पराभव झाला असताना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला बाद करून खळबळ उडवून दिली आहे. मोहम्मद शमीने केएल राहुलला दुसऱ्यांना पहिल्याच चेंडूवर बाद केलं आहे. मोहम्मद शमीचा सामना करताना केएल राहुलला अडचणीचा सामना करावा लागला आहे. आयपीएल स्पर्धेतील आकडेवारी तसं सांगत आहे. मोहम्मद शमीच्या 36 चेंडूंचा सामना केएल राहुलने केला आहे. यात तीन वेळा त्याला तंबूचा रस्ता दाखवला आहे. केएल राहुलचा मोहम्मद शमीविरुद्धची सरासरी 14.3 इतक आहे. मोहम्मद शमीने फक्त केएल राहुललाच नाही तर इतर फलंदाजांनाही अडचणीत आणलं आहे.

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची ताकद म्हणजे उत्कृष्ट लाइन लेंथ आणि स्विंग आहे. खेळपट्टी कोणतीही असली तरी चेंडू आत बाहेर वळवण्याची ताकद त्याच्यात आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत पर्पल कॅपही मिळवली आहे. सध्या मोहम्मद शमी टीम इंडिया बाहेर आहे. पण आयपीएल 2026 स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर त्याचा दरवाजे पुन्हा उघडू शकतात. त्याने त्याच्या कामगिरीची झलक दाखवली आहे.

विराट कोहलीचा शमीसमोर रेकॉर्ड काय?

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात विराट कोहली हा दिग्गज फलंदाज म्हणून गणला जातो. पण मोहम्मद शमीने त्याला पाच वेळा बाद केलं आहे. विराट कोहलीचा मोहम्मद शमीविरुद्धचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. विराट कोहलीने शमीविरुद्ध 12 डावात 107 धावा केल्या आहेत. पण पाच वेळा बाद करत मोहम्मद शमी वरचढ ठरला आहे.

हेटमायर देखील शमीचा शिकार

मोहम्मद शमीने शिमरोन हेटमायर याला देखील अडचणीत आणलं आहे. डावखुरा हेटमायर गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. पण शमीसमोर त्याचं काही एक चाललं नाही. मोहम्मद शमीच्या 17 चेंडूंचा सामना हेटमायरने केला आहे. त्याचा 4 वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. शमीविरुद्ध त्याची सरासरी 6 इतकी आहे.

विल्यमसनचं काय?

विल्यमसन सध्या आयपीएल स्पर्धेत खेळत नाही. पण फलंदाजीचं त्याचं तंत्र कायम चर्चेत राहिलं आहे. सहज विकेट घेणं गोलंदाजांना सोपं जात नाही. असं असताना 30 चेंडूत चार वेळा मोहम्मद शमीने त्याची विकेट काढली आहे. विल्यमसनची सरासरी फक्त 12 इतकी आहे. इतकंच काय तर राहुल त्रिपाठीला देखील 4 वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा