AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL स्पर्धेसाठी आपल्याच देशाशी घेतला पंगा! आरसीबीच्या खेळाडूने क्रिकेट बोर्डाला खेचलं कोर्टात

आयपीएल 2026 स्पर्धेची सुरूवात दमदार झाली आहे. पाच सामन्यांचा खेळ संपला असून गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. असं असताना काही संघांची बांधणी अद्याप खेळाडूंच्या गैरहजेरीत हवी तशी झालेली नाही. त्याने आरसीबीच्या एका खेळाडूला एनओसी मिळाली नसल्याने वाद कोर्टात गेला आहे.

IPL स्पर्धेसाठी आपल्याच देशाशी घेतला पंगा! आरसीबीच्या खेळाडूने क्रिकेट बोर्डाला खेचलं कोर्टात
IPL स्पर्धेसाठी आपल्याच देशाशी घेतला पंगा! आरसीबीच्या खेळाडूने क्रिकेट बोर्डाला खेचलं कोर्टातImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 02, 2026 | 5:27 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेची सुरूवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात आरसीबीने तगडी बॅटिंग लाइनअप असलेल्या सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं. यासह या स्पर्धेची सुरूवात विजयाने केली आहे. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला असला तरी गोलंदाजीबी बाजून कमकुवत असल्याचं दिसून आलं. जोश हेझलवूड आणि नुवान तुषाराची उणीव प्रकर्षाने भासली. ही स्पर्धा जशी पुढे सरकेल तसं गोलंदाजीची बाजू भक्कम करणं आरसीबीला भाग आहे. असं असताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नुवान तुषारा फिटनेस टेस्टमध्ये फेल झाल्याने एनओसी देण्यास नकार दिला आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार, फिटनेस टेस्ट पास केली तर विदेशी लीग स्पर्धेत खेळता येणार आहे. त्यामुळे नुवान तुषाराने थेट कोर्टाची पायरी चढली आहे. त्याने न्यायालयात याचिका दाखल करत ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 9 एप्रिलला होणार आहे.

नुवान तुषाराच्या 1.6 कोटींचं काय होणार?

आयपीएल स्पर्धेत  नुवान तुषारा हा आरसीबी संघाकडून खेळतो आणि मागच्या वर्षी त्याच्यासाठी 1.6 कोटींची बोली लावली होती. मागच्या पर्वात फक्त एकच सामना आरसीबीसाठी खेळला होता. तर हेझलवूडच्या गैरहजेरीत त्याची उणीव संघाला भासत आहे. असं असताना नुवान तुषारा अजूनही श्रीलंकेत आहे. तुषाराच्या मते, श्रीलंकन क्रिकेट बोर्डासोबतचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट हा 31 मार्चला संपला होता. पण असं असूनही श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने फिटनेसचं कारण देत ना हरकत प्रमाणपत्र दिलं नाही. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे 1.6 कोटीचं नुकसान होत असल्याचं तुषाराने याचिकेत नमूद केलं आहे.

नुवान तुषाराने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला काय सांगितलं?

नुवान तुषाराने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट घेण्यास नकार दिला आहे. त्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला स्पष्ट सांगितलं की, मला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नको. त्यामुळे त्याने आयपीएल खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तिलांजली दिली असंच म्हणावं लागेल. तुषारा श्रीलंकेचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने श्रीलंकेसाठी 30 टी20 सामने खेळले असून 36 विकेट काढल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 8.1 रन प्रति षटक आहे. त्याची गोलंदाजी शैली लसिथ मलिंगाशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे त्याचा सामना करणं फलंदाजांना कठीण जातं. त्यात चेंडू बाहेर स्विंग करण्यात तरबेज असल्याने फलंदाज फटकेबाजी करताना चूक करतात.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल