AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, MI vs DC : कुलदीप यादव पुन्हा डीआरएसच्या जाळ्यात फसला, रोहित शर्माही हसला

आयपीएल 2026 स्पर्धेतील आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. या सामन्यात मुंबईच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यात रोहित शर्माची विकेट घेण्यासाठी कुलदीप यादवचा डीआरएस चर्चेचा विषय ठरला.

IPL 2026, MI vs DC : कुलदीप यादव पुन्हा डीआरएसच्या जाळ्यात फसला, रोहित शर्माही हसला
कुलदीप यादव पुन्हा डीआरएसच्या जाळ्यात फसला, रोहित शर्माही हसलाImage Credit source: Twitter
| Updated on: Apr 04, 2026 | 7:58 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला. प्रथम गोलंदाजी घेत मुंबई इंडियन्सला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात मुंबई इंडियन्सची सुरूवात काही चांगली झाली नाही. पावर प्लेमध्येच मुंबई इंडियन्सने 2 महत्त्वाचे विकेट गमावल्या. अवघ्या 18 धावा असताना दोन विकेट धडाधड पडल्या. त्यामुळे संघावर दडपण वाढलं. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पावर प्लेमध्ये फार काही धावा आल्या नाही. सहा षटकात 41 धावा आल्या आणि विकेट वाचवण्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवला यश आलं. या जोडीने चांगला तग धरला होता. त्यामुळे ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान होतं. नववं षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव आला होता. या षटकात विकेटसाठी जोरदार अपील करण्यात आली. पण पदरी निराशा पडली. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

कुलदीप यादवच्या गोलंदाजीत काय झालं?

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात नववं षटक टाकण्यासाठी आलेल्या कुलदीप यादवच्या पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सूर्यकुमार यादव समोर होता. त्याने एक धाव काढत रोहित शर्माला स्ट्राईक दिली. रोहितने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत पुन्हा सूर्याला स्ट्राईक दिली. सूर्यकुमारने पुन्हा एक धाव काढली आणि स्ट्राईकला रोहित शर्मा आला. चौथ्या चेंडूवर रोहित शर्माने चौकार मारला. पण पाचव्या चेंडूवर स्वीप शॉट मारताना रोहित शर्मा फसला. विकेटच्या मागे असलेल्या केएल राहुलला झेल बाद असल्याचं भासलं आणि जोरदार अपील केली. त्याला कुलदीप यादवने साथ दिली. कुलदीप यादवने कसं बसं कर्णधार अक्षर पटेलला डीआरएस घेण्यासाठी विनवणी केली. त्याने त्याची विनवणी मान्य करून डीआरएस घेतला. यावेळी रोहित शर्माला हसू आलं. कारण त्याला माहिती होतं की रिव्ह्यू वाया जाणार आहे. झालंही तसंच.. रिव्ह्यू वाया गेला.

रोहित शर्मा कर्णधार असताना कुलदीप यादवच्या डीआरएस रिव्ह्यूचा अनेकदा अनुभव आला आहे. त्यामुळे त्याला हसू आलं असावं. कारण कुलदीप यादवने घेतलेला रिव्ह्यू वाया गेला. रोहित शर्माच्या पॅडला चेंडू हलका घासून गेला आणि केएल राहुलच्या हाती गेला होता. अल्ट्राएजमध्ये त्याचा खुलासा झाला. अपील झेलसाठी असल्याने तेवढंच तपासलं गेलं. एलबीडब्ल्यू तपासण्याची गरज भासली नाही. कारण कोणती अपील केली जाणार तेच तपासलं जातं.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा