AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBSK vs MI : मुंबईकडे हिशोब करण्याची संधी, पंजाबचा गेम करणार का?

Punjab Kings vs Mumbai Indians Preview, IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा 19 व्या मोसमातून बाजार उठला आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाब किंग्स गेल्या 4 सामन्यांपासून 2 गुणांसाठी लढत आहेत. मात्र पंजाबला सलग 4 पराभवांचा सामना करावा लागलाय. त्यामुळे पंजाबसाठी मुंबई विरुद्धचा सामना अतिशय अटीतटीचा ठरणार आहे.

PBSK vs MI : मुंबईकडे हिशोब करण्याची संधी, पंजाबचा गेम करणार का?
Shreyas Iyer and Hardik PandyaImage Credit source: Bcci
| Updated on: May 14, 2026 | 1:37 PM
Share

गुरुवारी 14 मे रोजी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 58 व्या सामन्यात (IPL 2026) पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील 12 वा सामना असणार आहे. पंजाबने पहिल्या 7 पैकी 6 सामने जिंकून प्लेऑफचा दावा मजबूत केला होता. तसेच पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी होती. मात्र त्यानंतर पंजाबचे दिवस फिरले. पंजाबला सलग 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता पंजाबला प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर उर्वरित 3 पैकी 2 सामने कोणत्याही स्थितीत जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे पंजाबचा चांगला कस लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे मुंबईला पराभव झाला तरी तसा काही फरक पडणार नाही. मात्र पंजाबचा पराभव झाल्यास त्यांच्याच अडचणीत वाढ होईल. त्यामुळे पंजाबसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे पंजाब मुंबई इंडियन्स विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पंजाब-मुंबई दुसऱ्यांदा आमनेसामने, पलटण हिशोब करणार?

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. याआधी उभयसंघात 16 एप्रिल रोजी सामना झाला होता. तेव्हा पंजाबने मुंबईला घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये पराभूत केलं होतं. पंजाबने विजयासाठी मिळालेलं 196 धावांचं आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं होतं. त्यामुळे मुंबई पंजाब विरुद्ध 14 मे रोजी घरच्या मैदानातील पराभवाची परतफेड करणार का? याकडे पलटणचं लक्ष असणार आहे.

मुंबई-पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

तसेच मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये 11 सामन्यानंतर 6 गुणांसह नवव्या स्थानी आहे. तर पंजाब किंग्स 11 पैकी 6 सामने जिंकून 13 गुणांसह चौथ्या स्थानी विराजमान आहे. पंजाबचा गेल्या सलग 4 सामन्यांत पराभव झालाय. त्यामुळे पंजाबसमोर सलग पाचवा पराभव टाळून प्लेऑफच्या शर्यतीत स्वत:ला कायम राखण्याचं आव्हान असणार आहे.

मुंबई-पंजाब हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यातील हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील 36 वा सामना असणार आहे. आतापर्यंत उभयसंघात 35 सामने खेळवण्यात आले आहेत. एका सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघ तोडीसतोड आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पंजाबने 35 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर मुंबईने पंजाबवर 17 सामन्यांत मात केली आहे. अशात आता 36 व्या सामन्याच्या निकालाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा