IPL 2026, PBKS vs SRH: नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी घेत श्रेयस म्हणाला..
आयपीएल 2026 स्पर्धेतील 17व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या निर्णयानंतर कर्णधार इशान किशन म्हणाला की...

आयपीएल 2026 स्पर्धेतील 17व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे संघ भिडणार आहेत. या स्पर्धेत पंजाब किंग्सची कामगिरी चांगली आहे. तर सनरायझर्स हैदराबादने एका सामन्यात विजय, दोन सामन्यात सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ 24वेळा आमनेसामने आले आहेत. सनरायझर्स हैदराबादने 14 सामने, तर पंजाब किंग्सने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत या दोन्ही संघात एकमेव सामना झाला होता आणि 8 गडी राखून हैदराबादने जिंकला होता. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तर सनरायझर्स हैदराबादच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे.
काय म्हणाला श्रेयस अय्यर?
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. हा दिवसाचा सामना आहे. खेळपट्टी कशी खेळेल याचा आम्हाला अंदाज घ्यायचा आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये आम्ही हेच करत आलो आहोत. आम्हाला त्याचाच फायदा होत आहे. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की तुम्ही हवामानावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तुम्हाला फक्त परिस्थितीनुसार वागावं लागतं. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आम्हाला कोणत्याही क्षणी कोणत्याही गोष्टीवर बोलण्याची गरज नाही.आम्हाला एकमेकांना आणि सर्व तरुण खेळाडूंना पाठिंबा देण्याची गरज आहे. आम्ही तोच संघ घेऊन खेळणार आहोत. नेहलच्या जागी प्रियांश संघात आला आहे.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशन म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार केला असता. आमच्या संघात तरुण गोलंदाज आहेत. दोन बदल केले आहेत. लिव्हिंगस्टोनच्या जागी सलील अरोरा आणि प्रफुल्ल हिंगे पदार्पण करत आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार विषक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर/कर्णधार), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, एशान मलिंगा