IPL 2026 Points Table : पंजाबला पराभवामुळे दुहेरी फटका, हैदराबादची पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

IPL 2026 Points Table : पंजाब किंग्स सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध अपयशी ठरली. पंजाबला 236 धावांचा पाठलाग करताना कूपर कॉनोली याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर 202 धावांपर्यंतच पोहचता आलं. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये उलथापालथ झालीय. जाणून घ्या.

IPL 2026 Points Table : पंजाबला पराभवामुळे दुहेरी फटका, हैदराबादची पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप
Sunrisers Hyderabad Huddle Talk
Image Credit source: Bcci
| Updated on: May 07, 2026 | 8:17 AM

सनरायजर्स हैदराबादने राजीव गांधी स्टेडियममध्ये पाहुण्या पंजाब किंग्सला आयपीएल स्पर्धेच्या 49 व्या सामन्यात 33 धावांनी पराभूत केलं. हैदराबादने पंजाब किंग्ससमोर 236 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पंजाबला विजयी धावांचा पाठलाग करताना 202 धावांपर्यंतच पोहचता आलं. हैदराबादने अशाप्रकारे हा सामना आपल्या नावावर केला. हैदराबादचा हा गेल्या 7 सामन्यांमधील सहावा विजय ठरला. तसेच हैदराबादचा घरात पंजाब विरुद्ध सलग नववा विजय ठरला. हैदराबादला या विजयासह दुहेरी फायदा झाला आहे. हैदराबादने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. तर पंजाबला पराभवामुळे फटका बसला आहे. हैदराबादने यासह गेल्या पराभवाचा हिशोब केला. पंजाबने याच मोसमात हैदराबादला पराभूत केलं होतं. आता या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमधील स्थितीबाबत जाणून घेऊयात.

हैदराबाद आणि पंजाब यांच्यात पॉइंट्स टेबलमधील नंबर 1 होण्यासाठी कडवी झुंज होती. मात्र पंजाबने 2 गुणांसह पहिल्या स्थानी कायम राहण्याची संधी गमावली. तर हैदराबादने विजयासह डबल धमाका केला. हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये 2 स्थानांची झेप घेत पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. हैदराबाद पंजाब विरूद्धच्या सामन्याआधी पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी होती. मात्र एका विजयाने पॉइंट्स टेबलमधील टॉप 3चं चित्र बदललं.

हैदराबादने दोघांना पछाडलं

हैदराबादने आरसीबी आणि पंजाबला मागे टाकत पहिल्या स्थानी झेप घेतलीय. हैदराबादच्या खात्यात 11 सामन्यानंतर 14 गुण आहेत. हैदराबाद 7 सामने जिंकणारी या मोसमातील पहिलीच टीम ठरली आहे. हैदराबादचा नेट रनरेट हा +0.737 असा झाला आहे जो सामन्याआधी +0.644 असा होता.

तर दुसऱ्या बाजूला पंजाबची पराभवासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. पंजाबच्या खात्यात आता ताज्या आकडेवारीनुसार 10 सामन्यानंतर 13 गुण आहेत. पंजाबने 6 सामने जिंकलेत. पंजाबचा 3 सामन्यांमध्ये पराभव झालाय. तर पंजाबचा 1 सामना पावसाने वाया घालवलाय. पंजाबचा नेट रनरेट हा पराभवानंतर +0.571 असा झालाय जो आधी +0.855 इतका होता.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

आरसीबी तिसऱ्या स्थानी

गतविजेत्या आरसीबीलाही हैदराबाद-पंजाब सामन्याचा पॉइंट्स टेबलमध्ये फटका बसला आहे. आरसीबीला एका स्थानाने नुकसान झालं आहे. आरसीबी टीमची दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. आरसीबीचा 7 मे रोजी लखनौ विरुद्ध सामना होणार आहे. आरसीबीला हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये पुन्हा नंबर 1 होण्याची संधी आहे.

Follow Us