AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs RCB Live Streaming : लखनौसमोर आरसीबीचं आव्हान, गतविजेता जिंकणार की पंतसेना अडवणार?

Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru IPL 2026 Live Scorecard: लखनौ सुपर जायंट्ससाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध होणारा हा सामना प्रतिष्ठेचा असणार आहे.

LSG vs RCB Live Streaming : लखनौसमोर आरसीबीचं आव्हान, गतविजेता जिंकणार की पंतसेना अडवणार?
Virat Kohli Rcb vs Lsg IPL 2026Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 07, 2026 | 7:56 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 50 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. लखनौ आणि आरसीबी दोन्ही संघांचा हा या मोसमातील दहावा सामना असणार आहे. ऋषभ पंत लखनौचं नेतृत्व करणार आहे. तर रजत पाटीदार याच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. लखनौला प्लेऑफची सर्वात कमी संधी आहे. मात्र लखनौसाठी आरसीबी विरुद्धचा सामना हा शेवटची संधी आहे. लखनौ सुपर जायंट्सने हा सामना गमावल्यास अधिकृतरित्या स्पर्धेतून पॅकअप होईल. त्यामुळे लखनौसाठी हा सामना करो या मरो तसेच आर या पार असाच आहे. त्यामुळे लखनौ या सामन्यात 2 गुण मिळवते की आरसीबी जिंकून प्लेऑफच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना कधी?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना गुरुवारी 7 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना कुठे?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर लाईव्ह मॅच पाहता येईल.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

ताज्या आकडेवारीनुसार, लखनौ पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी अर्थात दहाव्या स्थानी आहे. लखनौने 9 पैकी 2 सामने जिंकलेत. तर 7 गमावले आहेत. लखनौच्या खात्यात 4 गुण आहेत. तर आरसीबीने 9 पैकी 6 सामने जिंकलेत. तर गतविजेत्या संघाला 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

लखनौ बदला घेणार?

दरम्यान लखनौ आणि आरसीबीची आमनेसामने येण्याची ही या मोसमातील दुसरी वेळ आहे. याआधी 15 एप्रिलला आरसीबीने लखनौवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे लखनौ या पराभवाचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?