AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma: ‘माझा शेवटचा वर्ल्ड कप’ असं आधी विराट म्हणाला, आता रोहित शर्माची मोठी घोषणा

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माने आता निवृत्तीबद्दल स्पष्ट विधान केले आहे, ज्याची आता चर्चा सुरु आहे.

Rohit Sharma: 'माझा शेवटचा वर्ल्ड कप' असं आधी विराट म्हणाला, आता रोहित शर्माची मोठी घोषणा
| Updated on: Sep 27, 2026 | 8:25 AM
Share

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २७ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथील ग्रीन फील्ड स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी, रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या भविष्याबद्दल चर्चा केली. आधी विराट कोहलीने त्याच्या भविष्याबद्दल भाष्य केले होते आता रोहितनेही यावर भाष्य केले आहे.

रोहित म्हणाला की, माझे लक्ष सध्या फक्त पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे. मी सध्या निवृत्तीचा विचार करत नाही. जोपर्यंत तो क्रिकेट खेळत आहे, तोपर्यंत मला नेहमीच काहीतरी नवीन साध्य करायचे असेल. मी सर्व काही मिळवले आहे, असा विचार मी कधीही करणार नाही. मी आगामी विश्वचषक आणि त्यातून मिळणाऱ्या संधींबद्दल खूप उत्सुक आहे.

रोहितने स्पष्ट केले की, “विश्वचषक किंवा कोणत्याही आयसीसी स्पर्धेत खेळणे खूप आव्हानात्मक असते. प्रत्येक सामना वेगवेगळ्या मैदानांवर आणि नवीन संघांविरुद्ध खेळला जातो. यामुळे खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी एक वेगळी रणनीती तयार करावी लागते, आपल्या विचारसरणीत बदल करावा लागतो आणि मैदानात उतरण्यापूर्वी नव्याने तयारी करावी लागते.”

रोहित शर्माने भारतासाठी २००७ आणि २०२४ मध्ये दोनदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे, पण त्याला अद्याप एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघात स्थान मिळालेले नाही. २०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत पोहोचला तेव्हा रोहितचे कर्णधारपद होते, पण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. आता, २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे खेळल्या जाणाऱ्या पुढील एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्माला विश्वचषक ट्रॉफी उंचावण्याची आणखी एक मोठी संधी मिळेल.

रोहित शर्माने आपल्या शेवटच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आणि अंतिम सामन्यात शतक झळकावून आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली. आता, तो वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली कामगिरी करून संघात आपले स्थान आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक सुरू होईपर्यंत रोहित ४० वर्षांचा होईल आणि सध्या तो फक्त एकदिवसीय सामने खेळतो. त्याने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता रोहित आगामी विश्वचषकात चांगली कामगिरी करून भारताला विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.

Follow Us
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?