AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: आरसीबीच्या खेळाडूची सोन्याची चैन कोणी शोधली? केकेआरविरुद्धच्या सामन्यादरम्यान असं घडलं

RCB vs KKR: जगभरात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सोन्याची वस्तू हरवणं म्हणजे जीव गहाण ठेवण्यासारखं आहे. आरसीबी आणि केकेआर सामन्यात असंच घडलं. पण मैदानात पडलेली चैन अखेर सापडली आणि जीव भांड्यात पडला. कसं काय ते समजून घ्या

IPL 2026: आरसीबीच्या खेळाडूची सोन्याची चैन कोणी शोधली? केकेआरविरुद्धच्या सामन्यादरम्यान असं घडलं
IPL 2026: आरसीबीच्या खेळाडूची सोन्याची चैन कोणी शोधली? केकेआरविरुद्धच्या सामन्यादरम्यान असं घडलंImage Credit source: PTI
| Updated on: May 14, 2026 | 3:28 PM
Share

Jacob Bethells Gold Chain: आयपीएल 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता एक एक करत प्लेऑफचं चित्र स्पष्ट होत जाणार आहे. गुजरात टायटन्सनंतर आरसीबीने 16 गुणांचं गणित सोडवलं आहे. आयपीएलच्या 57व्या सामन्यात आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाची धूळ चारली. तसेच प्लेऑफमधील स्थान पक्कं केलं आहे. असं असताना या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. या सामन्यात एक खेळाडू सोन्याची चैन घालून मैदानात उतरला होता. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाही तर इंग्लंडचा क्रिकेटपटू जॅकब बेथेल होता. रायपूरच्या मैदानात विजयी धावांचा पाठलाग करताना जॅकब बेथेलच्या गळ्यातून सोन्याची चैन पडली. खरं तर मैदानात धावांचा पाठलाग करण्यासाठी गुंग असल्याने त्याला त्याबाबत काहीच कळलं नाही. पण नंतर कळलं तेव्हा त्याची बातमी झाली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ओपनर जॅकब बेथेलच्या गळ्यातून सोन्याची चैन गायब झाली? 13 मे रोजी आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यादरम्यान ही घटना घडली. जॅकब बेथेल बाद झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. चैन स्नॅचिंग तर झाली नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला. पण त्याची चैन मैदानात पडली होती. मैदानात फलंदाजी करेपर्यंत त्याला असं काही घडलं याची कल्पना नव्हती. आरसीबीच्या डावाच्या चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जॅकब बेथेल बाद झाला. वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने टाकलेला बाउंसर मारताना झेल बाद झाला. बाउंसर टाकलेला चेंडू पहिल्यांदा हाताला लागला आणि नंतर हेल्मेटला लागला. चेंडू हेल्मेटला आदळल्यानंतर एक झटका बसला आणि सोन्याची चैन पडली.

कार्तिक त्यागीने जॅकब बेथेलचा झेल पकडणअयात कोणतीच चूक केली नाही. बाद झाल्यानंतर जॅकब बेथेल डगआऊटमध्ये जात होता. या दरम्यान चैन पडल्याची कल्पना त्याला नव्हती. जॅकब बाद झाल्यानंतर मैदानात देवदत्त पडिक्कल फलंदाजीला आला. तेव्हा त्याला मैदानात जॅकबची चैन पडल्याचं दिसलं. त्याने चैन उचलली आणि पंचांनी दिली.

केकेआरने विजयासाठी दिलेल्या 193 धावांचा पाठलाग कताना जॅकब बेथेलच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्याने 12 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 15 धावा केल्या. पण त्यानंत विराट कोहलीने डाव सावरला आणि संघाला विजयाच्या वेशीवर नेलं. आरसीबीने विजयी लक्ष्य 19.1 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?