AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: तर माझी थेरी चुकीची नाही, वैभव सूर्यवंशीविषयी मोठे भाकीत, ती पोस्ट का होत आहे व्हायरल?

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. चार सामन्यातील तीन सामन्यात त्याची बॅट तळपली. तर सनराईजर्स हैदराबादविरोधात तो पुरता फिक्का पडला. त्याचवेळी एका अष्टपैलू भारतीय खेळाडूची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Vaibhav Suryavanshi: तर माझी थेरी चुकीची नाही, वैभव सूर्यवंशीविषयी मोठे भाकीत, ती पोस्ट का होत आहे व्हायरल?
वैभव सूर्यवंशी Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 16, 2026 | 4:44 PM
Share

Irfan Pathan React on Vaibhav Suryavanshi Wicket vs SRH: राजस्थान रॉयल्स संघाचा सर्वात कमी वयाचा खेळाडू वैभव सूर्यवंशीची मोठी चर्चा आहे. त्याने जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि इतर दिग्गज खेळाडूंना घाम फोडला आहे. पण सरराईजर्स हैदराबादचा खेळाडू प्रफुल्ल हिंगे याने पदार्पणातच या दमदार खेळाडूची पहिल्याच चेंडूवर विकेट काढली आणि सर्वांना धक्का दिला. सोमवारी झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी डक ठरला. त्याचवेळी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात त्याने यापूर्वी मांडलेली थेरी, सिद्धांत सांगितला होता. काय आहे ती पोस्ट?

10 एप्रिलचे ट्वीट काय?

10 एप्रिल रोजी इरफान पठाणने X (पूर्वीचे Twitter) वर एक ट्विट केले होते. त्यात वैभव सूर्यवंशी हा मुद्दाम काही गोलंदाजांना लक्ष्य करत असल्याचे त्याने म्हटले होते. दिग्गज गोलंदाज, ज्यात बुमराह वा इतर गोलंदाज आहेत. त्यांना वैभव याने धुवून काढले. त्यांच्या गोलंदाजीवर चौकार, षटकार ठोकले. त्याचवेळी विदर्भातील चर्चेत असलेला गोलंदाज प्रफुल्ल हिंगे याने त्याची पहिल्याच चेंडूत विकेट काढल्याने वैभवला कमाल दाखवता आली नाही. हिंगे T20 सामन्यात जास्त रुळलेला नाही.

सोमवारी इरफान पठाण याने त्याच्या X वर पोस्ट लिहिली, त्यानुसार, त्याने वैभव सूर्यवंशीविषयी जी मांडणी केली ती चुकीची नव्हती. म्हणजे वैभव हा मुद्दाम दिग्गज गोलंदाजांना टार्गेट करत होता, हे त्याने अधोरेखित केले. त्याच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडला आहे. अनेकांनी त्याचा मुद्दा ग्राह्य धरला आहे. तर काहींना हा तर्क मान्य नाही. समोर कोणी असले तरी आपल्याला मोठी धावसंख्या उभारायची हेच वैभवचं ध्येय असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

वैभव सूर्यवंशीने 3 सामन्यात एक अर्धशतक ठोकले आहे. वैभवने 40.67 च्या सरासरीसह 122 धावा केल्या आहेत. 17 चेंडूत 52 धावा चोपत त्याने चेन्नई सुपर किंग्सविरोधात दमदार कामगिरी बजावली आहे. त्यानंतर गुजरात टायटन्सविरोधात त्याने 18 चेंडूत 31 आणि मुंबई इंडियन्सविरोधात 14 चेंडूत 39 धावा चोपल्या आहेत. सरराईजर्स हैदराबादविरोधात मात्र त्याला कोणतीही कमाल दाखवता आली नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...