AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryawanshi: ‘वैभव’ टिकवण्यासाठी सूर्यवंशीला तो सर्वात मोठा इशारा; या कंपन्यांपासून सावध राहण्याचा सल्ला, प्रकरण तरी काय?

Vaibhav Suryawanshi Big Update: वैभव सूर्यवंशीला यंदा टीम इंडियात ब्रेक मिळम्याची दाट शक्यता आहे. तर त्याचवेळी संघ व्यवस्थापनाने त्याला एक मोठा इशारा दिला आहे. या कंपन्यांपासून दूर राहण्याचा आवर्जून सल्ला दिला आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

Vaibhav Suryawanshi: 'वैभव' टिकवण्यासाठी सूर्यवंशीला तो सर्वात मोठा इशारा; या कंपन्यांपासून सावध राहण्याचा सल्ला, प्रकरण तरी काय?
वैभव सूर्यवंशी Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 14, 2026 | 5:03 PM
Share

Vaibhav Suryawanshi Big Update: राजस्थान रॉयल्सचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. काल त्याला भोपळ्यावर आऊट व्हावे लागले असले तरी त्याने त्यापूर्वीच्या सामन्यांमध्ये गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली. जसप्रीत बुमराह याच्या पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार चोपला होता. त्याच्या स्फोटक फलंदाजीची मोठी चर्चा सुरू आहे. त्याला लवकरच टीम इंडियातही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण त्याचवेळी न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डूल यांनी त्याला मोठी चेतावणी दिली आहे.

मॅनेजमेंट कंपन्यांपासून दूर राहा

सायमन डूल याने मोठा सल्ला दिला आहे. वैभव याची कामगिरी संपूर्ण जग पाहत आहे. पण त्याने मॅनेजमेंट कंपन्यांपासून सावध राहावे. कारण कंपन्या त्याच्या कामगिरीचा फायदा उठवण्याची शक्यता आहे. क्रिकबजवर डूल यांनी सांगितले की, वैभव हा सुपरस्टार आहे. तो जर याच दमाने खेळला तर लवकरच तो सुपरस्टार होईल. खासकरून व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तो चमकेल. मॅनेजमेंट कंपन्यांचे लक्ष त्याच्यावरच आहे. त्या त्याचा फायदा उचलण्याची शक्यता आहे. त्या त्याच्यासोबत डील करण्याची शक्यता आहे.

सूर्यवंशीला अशा मॅनेजमेंट कंपन्या शोधत आहेत. त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. काहींच्या मते तर या कंपन्या वैभवच्या छबीचा आणि कामगिरीचा त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी उपयोग करू इच्छितात. याच गोष्टीचा त्याच्या खेळीवर परिणाम होऊ शकतो असे डूल यांना वाटते.

वैभव सदा सावधान

डूल यांच्या मते सूर्यवंशी याला अगोदर जाळ्यात ओढण्यात येईल. त्याला अनेक मोठी आश्वासनं देण्यात येतील. पण त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करावे. त्याने आता कामगिरीत अजून सातत्य दाखवावे. कंपन्या त्याचा फायदा उचलू पाहत आहेत. त्यामुळे वैभव याने या कंपन्यांपासून सावध असावे. या कंपन्या शार्क असल्याचा इशाराही त्यांनी वैभव सूर्यवंशीला दिला.

गेल्या तीन सामन्यात वैभवने अत्यंत स्फोटक कामगिरी बजावली. पण सनराईजर्स हैदराबाद विरोधात प्रफुल्ल हिंगे याच्या भेदक चेंडूवर तो झेल बाद झाला. त्याला शुन्यावरच आऊट व्हावे लागले. पण त्यापूर्वीच्या सामन्यात त्याने धुवाधार बॅटिंग केली. त्याने दमदार खेळी खेळली. गोलंदाजांचा घामाटा काढला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...