AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने अडचण सोडवली, पण सुरूवातीच्या सामन्यात डोकेदुखी कायम

आयपीएल 2026 स्पर्धा आता दोन दिवसांनी सुरू होणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी काही संघ संकटात आले आहेत. खेळाडूंच्या गैरहजेरीमुळे संघ बांधणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशीच एक अडचण चेन्नई सुपर किंग्ससमोर उभी आहे.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने अडचण सोडवली, पण सुरूवातीच्या सामन्यात डोकेदुखी कायम
IPL 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने अडचण सोडवली, पण सुरूवातीच्या सामन्यात डोकेदुखी कायमImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 25, 2026 | 4:30 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. कारण फलंदाजीचं युनिट एकदम पक्क झालं आहे. मात्र गोलंदाजीच्या युनिटमध्ये ऐनवेळी गडबड झाली आहे. कारण या स्पर्धेपूर्वी नाथन एलिस दुखापतीमुळे स्पर्धेतून आऊट झाला. त्यामुळे त्याच्या रिप्लेसमेंटसाठी धावाधाव सुरू झाली. कसं बसं करून त्याचा पर्याय सापडला. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत नाव नोंदवलेल्या स्पेन्सर जॉन्सनला संघात घेण्यात यश मिळालं. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. पण आता पुन्हा डोकं फिरण्याची वेळ आली आहे. कारण स्पेन्सर जॉन्सन सुरुवातीच्या काही सामन्यात खेळणार नसल्याचं बोललं जात आहे. चेन्नई सुपर किंग्सने याबाबतची माहिती दिली आहे. स्पेन्सर जॉन्सनला गेल्या दोन वर्षांपासून पाठदुखीचा त्रास आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून क्लियरन्स मिळणं आवश्यक आहे.

चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली की, स्पेन्सर जॉन्सन 21-22 एप्रिलला फ्रेंचायझीसोबत असेल. म्हणजेच जवळपास एक महिन्यांचा खेळ संपल्यानंतर स्पेन्सर या स्पर्धेत खेळायला उतरणार आहे. त्यामुळे सुरूवातीच्या सामन्यात गोलंदाजीच्या ताफ्यात बदल करण्यासाठी चेन्नईकडचा एक पर्याय कमी असेल. स्पेन्सर जॉन्सनची ही तिसरी आयपीएल फ्रेंचायजी आहे. चेन्नई सुपर किंग्सने त्याला 1.50 कोटी खर्च करून संघात घेतलं आहे. यापूर्वी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळणार होता. पण वैयक्तिक कारण देत त्याने या स्पर्धेतून माघार घेतली. आता चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात उतरणार आहे.

स्पेन्सर जॉन्सनने 2024 मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं होतं. यावेळी त्याची मूळ किंमत ही 50 लाख होती. पण गुजरात टायटन्सने लिलावात त्याच्यावर 10 कोटींची बोली लावून घेतलं होतं. पण त्याची कामगिरी काही विशेष राहिली नाही. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्याला संघात घेतलं. त्याच्यासाठी 2.80 कोटींची बोली लावून संघात घेतलं. पण त्याची कामगिरी काही विशेष राहिली नाही. आतापर्यंत आयपीएलध्ये 9 सामने खेळला असून 10पेक्षा जास्तीच्या इकोनॉमी रेटने फक्त 5 विकेट घेतल्या आहे. आता चेन्नई सुपर किंग्सला त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला