MI vs KKR: नाणेफेक होताच सूर्यकुमार यादवचा इम्पॅक्ट गूल! कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की..

आयपीएल 2026 स्पर्धेतील दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा मुंबईच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हार्दिक पांड्याने यावेळी आपल्या संघाबाबत विश्लेषण केलं. तर सूर्यकुमार यादवबाबत घेतला असा निर्णय

MI vs KKR: नाणेफेक होताच सूर्यकुमार यादवचा इम्पॅक्ट गूल! कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की..
MI vs KKR: नाणेफेक होताच सूर्यकुमार यादवचा इम्पॅक्ट गूल! कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की..
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 29, 2026 | 7:29 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात तसं पाहिलं तर मुंबईचं पारडं जड आहे. पण कोलकात्याचा कर्णधार हा मुंबईकर अजिंक्य रहाणे असल्याने त्याला या मैदानाची चांगली जाण आहे. त्यामुळे या सामन्यात काय होते याची उत्सुकता असणार आहे. नाणेफेकीचा कौल हा मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हार्दिक पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर स्पष्ट सांगितलं की, ‘आम्ही गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसतेय, ती नेहमीपेक्षा जास्त हिरवीगार दिसत आहे. बघूया ती कशी खेळते. हा आमचा बालेकिल्ला आहे, प्रेक्षक आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही एक चांगला खेळ करण्याच्या तयारीत आहोत. आम्ही दोन आठवड्यांपूर्वीच सुरुवात केली आहे. आमच्याकडे भरपूर अनुभव आणि युवा खेळाडूंचे मिश्रण आहे. रोहित, सूर्या, मिचेल सँटनर – त्यामुळे कर्णधारांची कमतरता नाही. मी फक्त मैदानात उतरून चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही 6 गोलंदाज आणि 5 फलंदाजांसह मैदानात उतरणार आहोत.’

मुंबई इंडियन्सने प्लेइंग 11 जाहीर केल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण यात सूर्यकुमार यादवचं नाव कुठेच नव्हतं. त्याचा फॉर्म पाहता त्याला प्लेइंग 11 मध्ये ठेवलं नसावं अशी कुजबूज सुरू झाली. पण त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयरमध्ये सूर्यकुमार यादवचं नाव आलं. सूर्यकुमार यादव क्षेत्ररक्षण करताना दिसेल की नाही हे सामना सुरू झाल्यावरच कळेल. पण दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरू शकतो. आता मुंबई इंडियन्सचा खेळ दुसऱ्या डावात कसा होतो यावर अवलंबून असणार आहे. कारण इम्पॅक्ट प्लेयर्सच्या यादीत कॉर्बिन बॉश, रॉबिन मिन्झ, राज बावा, अश्वनी कुमार हे खेळाडू देखील आहेत. पण फलंदाजीचा विचार करता सूर्यकुमार यादवला संधी मिळेल यात शंका नाही. टी20 वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार इम्पॅक्ट प्लेयर असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Loading...

दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘आम्ही गोलंदाजी करण्याच्या विचारात होतो. वानखेडेवर इतके गवत कधीच पाहिले नाही. तयारी चांगली झाली आहे. कोलकाता आणि मुंबईतही दोन शिबिरे झाली आहेत. मुंबई इंडियन्स एक चॅम्पियन संघ आहे हे आम्हाला माहीत आहे आणि आम्ही त्यांच्याविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहोत. फक्त वर्तमानात राहा आणि भूतकाळाकडे पाहू नका. काही खेळाडूंना दुखापत झाली आहे. आम्ही 6 फलंदाज आणि 5 गोलंदाजांसह खेळणार आहोत. चार विदेशी खेळाडू आहेत. यात कॅमेरून ग्रीन, फिन ॲलन, सुनील नरेन आणि ब्लेसिंग मुझारबानी आहेत.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us