MI vs KKR Live Score Updates, IPL 2026: शार्दूलने केकेआरची सलामी जोडी फोडली, फिन एलन आऊट
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Indian Premier League Live Score: आयपीएलच्या 19 व्या मोसमातील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे.

LIVE Cricket Score & Updates
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : शार्दूलने केकेआरची सलामी जोडी फोडली, फिन एलन आऊट
शार्दुल ठाकुर याने केकेआरची सेट जोडी फोडली आहे. शार्दुलन फिन एलन याला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. फिनने 17 बॉलमध्ये 37 रन्सची खेळी करुन रहाणेसह 5.2 ओव्हरमध्ये 69 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : केकेआरची संयमी सुरुवात, ओपनिंग जोडी सेट
कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध संयमी सुरुवात केली आहे. फिन एलन आणि अजिंक्य रहाणे या सलामी जोडीने 3 ओव्हरमध्ये नॉट आऊट 31 रन्स केल्या आहेत. फिन 20 आणि रहाणे 9 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : सामन्याला सुरुवात, केकेआरची बॅटिंग, रहाणे-एलन मैदानात
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. केकेआरकडून फिन एलन आणि कॅप्टन अजिंक्य रहाणे सलामी जोडी मैदानात आली आहे. तर मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट पहिली ओव्हर टाकत आहे.
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : केकेआर प्लेइंग ईलेव्हन
केकेआर प्लेइंग ईलेव्हन : फिन एलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरुन ग्रीन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा आणि ब्लेसिंग मुजराबानी
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, शार्दुल ठाकूर, मयंक मार्कंडे, एएम गझनफर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.
-
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : मुंबईने टॉस जिंकला, केकेआर विरुद्ध निर्णय काय?
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केकेआर पलटणसमोर किती धावा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : थोड्याच वेळात टॉस, कोण जिंकणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये सामना होत असल्याने मोठ्या प्रमाणात पलटणचे चाहते आले आहेत.
-
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स केकेआरवर वरचढ
आयपीएलच्या इतिहासात मुंबई केकेआरवर वरचढ राहिली आहे. उभयसंघात एकूण 35 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने त्यापैकी 24 सामने जिंकले आहेत. तर केकेआरने 11 सामन्यांत विजय मिळवला आहे.
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, शार्दुल ठाकूर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राज बावा, रॉबिन मिंझ, नमन धीर, रायन रिकेल्टन, एएम गझनफर, मयंक मार्कंडे, दानिश मलेवार, अश्वनी कुमार, मोहम्मद सलाहुद्दीन इझार, विल जॅक्स, मिचेल सँटनर, मयंक रावत, अथर्व अंकोलेकर आणि रघु शर्मा.
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स टीम
फिन ऍलन, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), कॅमेरुन ग्रीन, टीम साफर्ट (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, आंगकृष्ण रघुवंशी, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, कार्तिक त्यागी, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, मनीष पांडे, वैभव अरोरा, रचिन रवींद्र, ब्लेसिंग मुजराबानी, नवदीप सैनी, प्रशांत सोलंकी, दक्ष कामरा, सार्थक रंजन, तेजस्वी दहिया आणि सौरभ दुबे.
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर आमनेसामने, कोण करणार विजयी सुरुवात?
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2026 मोसमातील आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं तर अजिंक्य रहाणे केकेआरचं नेतृत्व करणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आयपीएल 2026 स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात एकमेकांविरुद्ध 2 हात करत आहेत. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. वानखेडे मुंबईचं होम ग्राउंड आहे. त्यामुळे वानखेडेत पलटणचा मुंबईला फुल्ल सपोर्ट असणार आहे. मुंबईला 2013 पासून आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक मोसमात आपला पहिला सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे यंदा पलटण केकेआरला पराभूत करत विजयी सुरुवात करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेऊयात.
Published On - Mar 29,2026 6:07 PM
