AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: मुंबई इंडियन्सला लोळवले, वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची प्रतिक्रिया तुफान व्हायरल, म्हणाला तरी काय?

Vaibhav Suryavanshi: राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला लोळवले. वैभव सूर्यवंशीने या सामन्यात कमाल दाखवली. बुमराहला मारलेला षटकार चाहत्यांच्या मनावर अमिट छाप सोडून गेला. त्याचवेळी वैभवने त्याच्या चाहत्यासाठी खास 4 शब्दांची प्रतिक्रिया दिली आहे. ती सध्या चर्चेत आली आहे.

Vaibhav Suryavanshi: मुंबई इंडियन्सला लोळवले, वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची प्रतिक्रिया तुफान व्हायरल, म्हणाला तरी काय?
वैभव सूर्यवंशी Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 08, 2026 | 2:11 PM
Share

Vaibhav Suryavanshi: मंगळवारी वैभव सूर्यवंशीने मुंबई इंडियन्सला लोळवले. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या आणि दीपक चाहर सारख्या दिग्गज गोलंदाजाचा त्याने खणखणीत समाचार घेतला. या दमदार गोलंदाजांना त्याने फोडून काढले. तो या दिग्गज गोलंदाजाला पुरून उरला. वैभव थोडाही घाबरला नाही. त्याने बुमराह याला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्याच्या या खेळीने भल्याभल्या गोलंदाजान घाम फोडला. वैभवने त्याच्या चाहत्यासाठी खास 4 शब्दांची प्रतिक्रिया दिली. तो संदेश आता चर्चेत आला आहे.

बुमराह तर पाहतच राहिला

पहिल्याच चेंडूवर त्याने बुमराह याला षटकार झोडला. त्याच्या या कृतीने फॅन्ससह सर्वच जण अचंबित झाले. लाँग ऑनवर त्याने खतरनाक पद्धतीने षटकार टोलावला. वैभवने त्याच्या दमदार खेळीनंतर सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याने केवळ 4 शब्दांमध्ये मनातील भावना व्यक्त केल्या. हंगामातील तिसऱ्या डावात वैभव सूर्यवंशी याने केवळ 14 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांसह 40 धावा केल्या. त्याने सलामीला उतरत यशस्वी जायसवाल याच्यासोबत 5 षटकामध्ये 80 धावा चोपल्या. शार्दुल ठाकूर याच्या चेंडूवर त्याने फटका मारला पण तिलक वर्माने तो टिपला. वैभवचा झेल त्याने पकडला. तर त्या षटकात त्याने बाद होण्यापूर्वी 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला होता.

या दोघांच्या दमदार खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्यात 11 षटकात 2 गडी बाद 150 धावा केल्या. तर 151 धावांचे उद्दिष्ट समोर असताना लक्ष्याचा धावा करताना मुंबई इंडियन्स संघ 9 गडी बाद 123 धावांवर बाद झाला.

राजस्थान रॉयल्सने या हंगामात सलग तिसरा विजय मिळवला आहे. या संघाने 6 गुण खात्यात जोडले आहेत. गुणतालिकेत हा संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. रॉयल्सच्या विजयानंतर वैभव सूर्यवंशीने सोशल मीडियावर या सामन्यातील काही छायाचित्र शेअर केली आहेत. या इन्टाग्रामवरील पोस्टमध्ये त्याने त्याच्या फलंदाजीचा अंदाज सादर केला. संघासोबतचे छायाचित्रही शेअर केले. त्याने इन्स्टाग्रामवर एक खास संदेश लिहिला. 15 वर्षांच्या वैभव याने सोशल मीडियावर लिहिले आहे की, ‘तुमच्या पाठिंब्यासाठी खूप धन्यवाद.’

Follow Us
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान