IPL Final 2023 मध्ये M S Dhoni चा महाविक्रम, गुजरात विरुद्ध मैदानात उतरताच धमाका, चाहत्यांकडून धोनी-धोनीचा जयघोष

| Updated on: May 29, 2023 | 8:09 PM

आयपीएल 16 व्या मोसमातील महाअंतिम सामना हा पावसामुळे 28 मे रोजी खेळवता आला नाही. मात्र आता राखीव दिवस असल्याने 29 मे रोजी चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यात खेळवण्यात येत आहे.

IPL Final 2023 मध्ये M S Dhoni चा महाविक्रम, गुजरात विरुद्ध मैदानात उतरताच धमाका, चाहत्यांकडून धोनी-धोनीचा जयघोष
Follow us on

अहमदाबाद | पावसाच्या बॅटिंगनंतर अखेर राखीव दिवशी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2023 फायनल मॅचला सुरुवात झालीय. चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकून विजयी सुरुवात केली. कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याने गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडल. धोनीने टॉसला मैदानात येताच मोठा विक्रम स्थापित केलाय. धोनी अशी कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटर ठरलाय. धोनीचं या रेकॉर्डसाठी सोशल मीडियावर कौतुक केलं जातंय.

नक्की रेकॉर्ड काय?

महेंद्रसिंह धोनी याचा हा आयपीएल कारकीर्दीतील 250 वा सामना आहे. धोनीने आतापर्यंत 249 सामने खेळले आहेत. धोनीने या 16 वर्षांच्या कारकीर्दीत चेन्नई सुपर किंग्स आणि रायजिंग पुणे सुपर जायंट्स टीमचं प्रतिनिधित्व केलंय. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनीनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचा नंबर लागतो.

धोनीचा महारेकॉर्ड

सर्वाधिक आयपीएल सामने

महेंद्रसिंह धोनी – 250*

रोहित शर्मा -243

दिनेश कार्तिक -242

विराट कोहली – 237

रविंद्र जडेजा 226

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कॅण्ड विकेट), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (क), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.