CSK vs GT Final | गुजरात विरुद्धच्या महाअंतिम सामन्यात चेन्नईचा स्टार ऑलराउंडर प्लेइंग इलेव्हनमध्ये नाहीच!

| Updated on: May 28, 2023 | 6:06 PM

चेन्नई सुपर किंग्स गुजरात टायटन्स विरुद्ध फायनल सामन्यात खेळणार आहे. चेन्नईचा गुजरातवर मात करत पाचव्यांदा चॅम्पियन होण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्याआधी चेन्नईला या स्टार ऑलराउंडरची नक्कीच उणीव भासेल.

CSK vs GT Final | गुजरात विरुद्धच्या महाअंतिम सामन्यात चेन्नईचा स्टार ऑलराउंडर प्लेइंग इलेव्हनमध्ये नाहीच!
Follow us on

अहमदाबाद | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023 फायनल महामुकाबला होणार आहे. चेन्नईची अंतिम सामना खेळण्याची ही दहावी वेळ आहे. तर गुजरात सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचली आहे. त्यात हा महाअंतिम मुकाबला गुजरात टायटन्स टीमच्या होम ग्राउंड असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे गुजरातला होम एडव्हान्टेज आहे. मात्र चेन्नई फुल रंगात आहे. चेन्नई या हंगामात सुरुवातीपासून उल्लेखनीय कामगिरी करतेय. त्यात धोनी जातोय त्या स्टेडियमध्ये त्याचेच चाहते दिसतायेत. त्यामुळे समर्थकांकडून धोनी संघांना सपोर्ट हा बरोबरीचा असणार आहे.

तर दुसऱ्या बाजूला या अतिशय अशा महत्वाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला आपल्या स्टार ऑलराउंडरची निश्चितच उणीव जाणवेल. तो नक्की कोणता खेळाडू आहे, हे आपण जाणून घेऊयात.

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार ऑलराउंडर आणि मॅचविनर असलेला हा खेळाडू या मोसमादरम्यान टीमची साथ सोडून घरी परतला. फिटनेसच्या कारणामुळे बेन स्टोक्स आयपीएल 2023 मधून बाहेर पडला. चेन्नईने बेन स्टोक्सला 2022 मध्ये झालेल्या ऑक्शनमधून 16 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र बेनला 2 सामन्यातच खेळता आलं. बेनने या 2 सामन्यात फक्त 8 धावा केल्या. कॅप्टन धोनीला स्टोक्सची निश्चितच उणीव जाणवेल.

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.