IPL Final : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड उघडा पडला, स्टेडिअममधील तो व्हिडीओ व्हायरल!

| Updated on: May 29, 2023 | 6:08 PM

GT vs CSK Final 2023 : रविवारी झालेला पाऊस काही साधासुधा झाला नाही. या पावसाने जगातील सर्वात मोठं असलेल्या क्रिकेट स्टेडिअमचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं.

IPL Final : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड उघडा पडला, स्टेडिअममधील तो व्हिडीओ व्हायरल!
Follow us on

मुंबई : आयपीएलचा फायनल सामना 28 मे ला होणार होता. मात्र पावसामुळे सामना रद्द झाला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 मे ला राखीव दिवशी ठेवण्यात आला आहे. गुजरात संघाचं होम ग्राऊंड असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. फायनल सामना सुरू व्हायला काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. रविवारी झालेला पाऊस काही साधासुधा झाला नाही. या पावसाने जगातील सर्वात मोठं असलेल्या क्रिकेट स्टेडिअमचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

अहमदाबादमध्ये रविवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे चाहत्यांनी ओले होण्यापासून वाचण्यासाठी छताखाली आसरा घेतला, पण इथेही काही चाहत्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. नरेंद्र मोदी स्टेडियमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टेडियमच्या छतावरून पाणी गळताना दिसत आहे.

 

 

स्टेडियममधील निकृष्ट व्यवस्थेमुळे बीसीसीआयला आधीच टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता नव्या आणि मोठ्या स्टेडियमची ओळख बनलेल्या या स्टेडियमची ही अवस्था जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डासाठी लाजिरवाणी आहे.

 

विश्वचषक भारतात होणार असून स्पर्धेचा अंतिम सामनाही याच स्टेडियममध्ये होणार असल्याचे मानले जात आहे. आता ऑक्‍टोबर-नोव्हेंबरचा हंगाम पावसाळी नसला तरी पावसाची स्थिती कायम राहिल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर बीसीसीआय तोंडावर पडू शकतं.

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल