
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने होते. हा सामना पंजाब किंग्सने 7 विकेट्सने जिंकला. चेन्नईने कॅप्टन ऋतुराज गायकवाड याच्या 62 धावांच्या जोरावर पंजाबला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पंजाबचा हा या हंगामातील चौथा विजय ठरला. या सामन्यानंतर ऑरेंज कॅप कुणाकडे आहे? हे जाणून घेऊयात. एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ही ऑरेंज कॅप दिली जाते.
ऋतुराजने पंजाब विरुद्ध 129.17 च्या स्ट्राईक रेटने 5 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 48 बॉलमध्ये 62 धावांची खेळी केली. ऋतुराजने या खेळीसह या 17 व्या हंगामात 500 धावांचा टप्पा पार केला. तसेच ऋतुराजने या 500 धावा करण्यासह 2 कीर्तीमान आपल्या नावे केले. ऋतुराज आयपीएलच्या इतिहासातील एका हंगामात 500 धावा करणारा पहिला कर्णधार ठरला. तसेच यंदाच्या हंगामात ऋतुराज विराटनंतर 500 पार पोहचणारा दुसरा फलंदाज ठरला. ऋतुराजने 62 धावांच्या खेळीसह विराटला मागे टाकत ऑरेंज कॅप मिळवली.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये 3 कर्णधार आहेत. यामध्ये ऋतुराज गायकवाड अव्वल स्थानी आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल चौथ्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली दुसऱ्या आणि साई सुदर्शन तिसऱ्या स्थानी आहे. ऋतुराजच्या 62 धावांच्या खेळीसह एकूण 10 सामन्यात 509 धावा झाल्या आहेत. विराट आणि ऋतुराजमध्ये फक्त 9 धावांचं अंतर आहे. विराटने 10 सामन्यात 500 धावा केल्या आहेत.
तर साई सुदर्शन याच्या नावावर 10 सामन्यांमध्ये 418 रन्स आहेत. केएल राहुलने 10 सामन्यात 406 रन्स केल्या आहेत. साई आणि केएलमध्ये फक्त 12 धावांचं अंतर आहे. तर ऋषभ पंतने 11 सामन्यात 398 धावा केल्या आहेत.
ऋतुराजच्या डोक्यावर ऑरेंज कॅप
CAPTAIN OF CSK AT THE TOP. 💪 pic.twitter.com/cvXiyqeJF6
— Johns. (@CricCrazyJohns) May 1, 2024
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), शार्दूल ठाकुर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन आणि मुस्तफिजुर रहमान.