
ऑरेज कॅपच्या शर्यतीत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने एन्ट्री मारली आहे. संजू सॅमसनने संघाला विजय मिळवून देण्यासाठी झुंजार खेळी केली. मात्र ही खेळी व्यर्थ गेली. कारण राजस्थान रॉयल्स विजय काही मिळाला नाही. संजू सॅमसनने 46 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या. यासह संजू सॅमसनने ऑरेंज कॅपच्या टॉप 5 मध्ये मजल मारली आहे. पण ऑरेंज कॅपचा मान या सामन्यानंतरही विराट कोहलीकडे कायम आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यानंतर काय तो फरक दिसून येईल. या सामन्यात चुकून ऋतुराज गायकवाड शून्यावर बाद झाला. तर मग ऑरेंज कॅपचा मान विराट कोहलीकडेच कायम राहील. पण ऋतुराज गायकवाडने 2 धावा करताच ऑरेंज कॅपचा मानकरी तो ठरेल. आता पुढे ऑरेंज कॅपची लढत या दोघांमध्ये असणार आहे. कारण संजू सॅमसन टॉप 5 मध्ये आला असला तर या दोघांना मागे टाकण्यासाठी एक शतकी खेळी करणं अपेक्षित आहे.
विराट कोहली 11 सामन्यात 542 धावा करत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. ऋतुराज गायकडवाड 541 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. संजू सॅमसनने 86 धावांची खेळी करत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याने 11 सामन्यात एकूण 471 धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नरीन आहे. त्याने 11 सामन्यात 461 धावा केल्या आहेत. तर पाचव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेड आहे. त्याने 10 सामन्यात 444 धावा केल्या आहेत. आता शेवटपर्यंत धावांची गती कोण कायम ठेवतो याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून आहे. कारण प्रत्येक सामन्यात विराट कोहली काही ना काही धावा करत आहे. तसेच त्याचा पाठलाग करणं इतर फलंदाजांना कठीण जात आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/ कर्णधार), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद