IPL 2024 Points Table : राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत जैसे थे, दिल्लीला पराभूत करत स्थान टिकवलं

| Updated on: Mar 29, 2024 | 12:01 AM

RR vs DC 9th Match of Season : आयपीएल स्पर्धेच्या नवव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. हा सामना राजस्थान रॉयल्स संघाने 12 धावांनी जिंकला. या विजयासह राजस्थान रॉयल्स संघाने गुणतालिकेत स्थान टिकवलं आहे.

IPL 2024 Points Table : राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत जैसे थे, दिल्लीला पराभूत करत स्थान टिकवलं
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेवर फरक दिसून येत आहे. स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्याचे सामने सुरु आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. होम ग्राउंडचा ट्रेंड येथेही लागू पडला. राजस्थानच्या होम ग्राउंडवर झालेल्या सामन्यात दिल्लीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला होता. दिल्लीने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने राजस्थानला बऱ्यापैकी जाळ्यात अडकवलं होतं. पण रियान परागने या सर्वावर पाणी फेरलं. रियानने नाबाद 84 धावांची खेळी केली. तसेच शेवटच्या षटकात ठोकलेल्या 25 धावा दिल्लीच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 5 गडी गमवून 185 धावा केल्या आणि विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं. दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकात 5 गडी गमवून 173 धावा करता आल्या. दिल्लीला 12 धावांनी पराभव सहन करावा लागला.

चेन्नई सुपर किंग्स दोन पैकी दोन सामने जिंकत 4 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. नेट रनरेट हा 1.979 इतका आहे. तर राजस्थान रॉयल्सने सलग दुसरा सामना जिंकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. 4 गुण आणि 0.800 च्या रनरेटसह दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. सनरायझर्स हैदराबाद 2 गुण आणि 0.675 नेट रनरेटसह तिसऱ्या, कोलकाता नाईट रायडर्स 2 गुण आली 0.200 नेट रनरेटसह चौथ्या, पंजाब किंग्स 2 गुण आणी 0.025 नेट रनरेटसह पाचव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 2 गुण आणि -0.180 नेट रनरेटसह सहाव्या स्थानी, तर गुजरात टायटन्स 2 गुण आणि -1.425 नेट रनरेटसह सातव्या स्थानी आहे.

संघसामनेविजय पराजयनेट रनरेटगुण
राजस्थान रॉयल्स330+1.249 6
कोलकाता नाईट रायडर्स220+1.0474
चेन्नई सुपर किंग्स 3210.9764
गुजरात टायटन्स321-0.7384
सनरायझर्स हैदराबाद312+0.2042
लखनऊ सुपर जायंट्स2110.0252
दिल्ली कॅपिटल्स212-0.016 2
पंजाब किंग्स3120.3372
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु312-0.7112
मुंबई इंडियन्स 303-1.4230

दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना अजूनही विजयाचं खातं खोलता आलेलं नाही. लखनौ सुपर जायंट्सचा एकच सामना झालेला आहे. आता लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुसऱ्या टप्प्यातील सामना होईल. त्यानंतर पुन्हा एकदा गुणतालिकेत उलटफेर दिसून येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्याच्या सामन्यांना सुरुवात होईल.

दोन्ही संघांचे खेळाडू

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान