IPL 2024 Points Table: राजस्थान रॉयल्सला पराभूत करत हैदराबादची टॉप 4 मध्ये एन्ट्री, चेन्नईला बसला फटका

आयपीएल 2024 स्पर्धेतील 50वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं. या विजयासह टॉप 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. तर चेन्नई सुपर किंग्सला फटका बसला आहे.

IPL 2024 Points Table: राजस्थान रॉयल्सला पराभूत करत हैदराबादची टॉप 4 मध्ये एन्ट्री, चेन्नईला बसला फटका
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 11:32 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 50 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पॉवर प्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादची स्थिती नाजूक होती. मात्र त्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि नितिश रेड्डी यांनी डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी केली. हेड आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर नितीश रेड्डी आणि हेनरिक क्लासेनने डाव सावरला. दोघांनी नाबाद 70 धावांची भागीदारी केली. नितीश रेड्डीने नाबाद 76 आणि हेनरिक क्लासेनने नाबाद 42 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 3 गडी गमवून 201 धावा केल्या आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना राजस्थान रॉयल्सने चांगली झुंज दिली. 7 गडी गमवून 200 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती. रोवमॅन पॉवेल स्ट्राईकला होता भुवनेश्वर कुमारने यॉर्कर लेंथ चेंडू टाकला. फटका मारताना पॉवेल चुकला आणि पायचीत झाला. शेवटच्या चेंडूवर पॉवेल रिव्ह्यू घेतला आणि तपासणीत बाद असल्याचं स्पष्ट झालं. सनरायझर्स हैदराबादने हा सामना अवघ्या एका धावेने जिंकला. यासह गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. सनरायझर्स हैदराबादने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर चेन्नई सुपर किंग्सची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

राजस्थान रॉयल्स 16 गुण आणि +0.622 नेट रनरेटसह पहिल्या, कोलकाता नाईट रायडर्स 12 गुण आणि +1.096 नेट रनरेटसह दुसऱ्या, लखनौ सुपर जायंट्स 12 गुण आणि +0.094 नेट रनरेटसह तिसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद 12 गुण आणि +0.072 नेट रनरेटसह चौथ्या, चेन्नई सुपर किंग्स 10 गुण आणि +0.627 नेट रनरेटसह पाचव्या, दिल्ली कॅपिटल्स 10 गुण आणि -0.442 नेट रनरेटसह सहाव्या, पंजाब किंग्स 8 गुण आणि -0.062 नेट रनरेटसह सातव्या, गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.113 नेट रनरेटसह आठव्या, मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.272 नेट रनरेटसह नवव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 6 गुण आणि -0.415 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.