IPL : दिल्ली कॅपिटल्सच्या हेड कोचपदावरून रिकी पॉन्टिंगला हटवलं, गांगुलीकडून नवीन हेडची घोषणा

Ricky Ponting removed head coach of Delhi Capitals : क्रिकेट विश्वातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या पुढील मोसमाआधी दिल्ली कॅपिटल्सच्या हेड कोचपदावरून पंटर याला हटवण्यात आलं आहे.

IPL : दिल्ली कॅपिटल्सच्या हेड कोचपदावरून रिकी पॉन्टिंगला हटवलं, गांगुलीकडून नवीन हेडची घोषणा
Ricky Ponting has been removed as the head coach of Delhi Capitals
| Updated on: Jul 13, 2024 | 8:22 PM

आयपीएलच्या येत्या हंगामाआधी मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे हेड कोचपदावरून रिकी पॉन्टिंग यांना हटवण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये 2018 पासून रिकी पॉन्टिंग हा दिल्ली कॅपिटल्स संघासोबत जोडला गेला होता. मात्र दिल्लीला एकदाही तो विजेतेपदापर्यंत पोहोचू शकला नाही. दिल्लीच्या फ्रँचायझीच्या संचालक सौरग गांगुली याने एका वृत्तपत्रासोबत बोलताना माहिती दिली. दिल्ली कॅपिटल्सनेही याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

आयपीएल 2024 नंतर रिकी पाँटिंगचा डीसीसोबतचा करार संपला आहे. डीसीने त्याचा करार वाढवण्याचा निर्णय घेतलेला नाही. ऋषभ पंत हा कॅप्टन आणि सौरव गांगुली स्वत: हेड कोचच्या भूमिकेत पुन्हा एकदा आयपीएल 2025 मध्ये भूमिकेत दिसणार आहेत.

2018 पासून रिकी पॉन्टिंग दिल्लीसोबत होता पण फक्त 2021 मध्येच दिल्ली कॅपिटल्स संघाला फायनलपर्यंत धडक मारता आली होती. पाँटिंग हेड कोच असताना दिल्लीच्या संघाने तीनवेळा प्लेऑफ गाठला होती. मात्र विजेतेपदावर नाव कोरता आलं नाही. इतर मोसमात प्रदर्शन इतकं काही खास राहिलं नाही. यंंदा झालेल्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर होती. आयपीएलमध्ये रिकी पॉन्टिंग 2014 ते 2016 या काळात मुंबईचा हेड कोच होता. यामधील 2015 ला मुंबई इंडियन्सने विजेतेपदावर नाव कोरलं होतं.

दरम्यान, आयपीए 2025 च्या पुढील मोसमाआधी मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयने याची तयारीही सुरू केली असून फ्रंचायसींसोबतही काही गोष्टींबाबत सल्लामसलत केली जात आहे. बीसीसीआय सर्व संघमालकांसोबत बैठक घेणार असून, त्यानंतर किती खेळाडूंना कायम ठेवायचे हे समोर येईल.