शेंगदाणे खात होती चार वर्षांची चिमुकली, घशात शेंगदाणा अडकला आणि अखेर….
एका लहान चिमुरडीने शेंगदाणे खात असताना तिच्या घशात शेंगदाण अडकल्याने तिचा गुदरमरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. लहान मुलांना असे पदार्थ देताना सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

शेंगदाणे खाताना घशात शेंगदाणा अडकल्याने एका चार वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही छोटीशी मुलगी शेंगदाणे खात असताना तिच्या श्वास नलिकेत शेंगदाणा अडकल्याने तिला गुदरमल्यासारखे झाला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले.
उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथील रुनी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. चार वर्षांची चिमुरडी पलक खेळता – खेळता शेंगदाणे खात होती. तेव्हा अचानक शेंगदाणा तिच्या गळ्यात अडकला. त्यानंतर ही चिमुरडी तडफडू लागली. कुटुंबियांतील लोकांना कळेना काय करावे. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतू तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
रुनी गावात अनुज कठेरिया आणि त्यांची पत्नी रेनू घरात कामात व्यस्त होते. त्यावेळी त्यांची चार वर्षांची मुलगी पलक तिच्या दोन लहान भावांसह विशेष ( ७ ) आणि सुर्यांश ( ६ ) यांच्या सोबत खेळत होती. त्यावेळी ते शेंगदाणे खात होते. ती नेहमीच शेंगदाणे खात असते. त्यामुळे त्यांनी विशेष काही लक्ष दिले नाही. परंतू अचानक एक शेंगदाणा तिच्या गळ्यात अडकला,त्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता.
सुरुवातीला तिच्या भावांना या धोक्याचा अंदाज आला नाही. काही वेळाने पलक बैचेन होऊन तडफडू लागली. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर दोन्ही भाऊ रडू लागले. गोंधळ ऐकून तिचे वडील अनुज रुममध्ये आले. त्यांना पाठ थोपटवून शेंगदाना काढण्याचा प्रयत्न केला, परंतू काही यश आले नाही. पलक गुदमरुन बेशुद्ध झाली.
त्यानंतर तिला पालकांनी लोहिया रुग्णालयात नेले. तेथे आपात्कालिन वॉर्डात चिकित्सक डॉ.अमन कुमार यांनी तिला तपासले. त्यावेळी तिचे श्वास बंद झाले होते. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. त्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.
तपासल्यानंतर कळाले की शेंगदाणा पलक हिच्या श्वास नलिकेत अडकला होता. त्यामुळे तिचा श्वास गुदरमला. जर वेळेत तिच्या गळ्यात बोटे टाकून तिला ओकारी करायला भाग पाडले असते किंवा प्रथमोपचार मिळाले असते तर कदाचित ती वाचली असती असे त्यांनी सांगितले. लहान मुलांना शेंगदाणे, चणे, काजू, द्राक्षे असे छोटे खाद्यपदार्थ देताना सावध असायला हवे असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
