IPL : आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये ‘या’ भारतीय स्टार खेळाडूंनी कमावलेत खोऱ्याने पैसे, एक नंबरला खास खेळाडू

| Updated on: Mar 28, 2023 | 11:57 PM

लवकरच आयपीएलचा 16वा सीझन सुरू होत आहे. चाहतेही उत्सुक झाले आहेत असून यंदाची आयपीएलच्या 16 व्या पर्वाची ट्रॉफी जिंकण्यासाठी 10 संघ मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी समोर!

IPL : आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये या भारतीय स्टार खेळाडूंनी कमावलेत खोऱ्याने पैसे, एक नंबरला खास खेळाडू
Follow us on

मुंबई : लवकरच आयपीएलचा 16वा सीझन सुरू होत आहे. चाहतेही उत्सुक झाले आहेत असून यंदाची आयपीएलच्या 16 व्या पर्वाची ट्रॉफी जिंकण्यासाठी 10 संघ मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. नेहमीप्रमाणेच यंदाच्या आयपीएलमध्येही सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. रोहित शर्मा, एमएस धोनी आणि विराट कोहली हे आयपीएलचे स्टार आहेत. आयपीएल सुरू झाली की हे तिघे चर्चेत असतातच.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित आणि धोनी टॉप 2 मध्ये आहेत. आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या कामगिरीबद्दल सांगायचं झालं तर मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माने सर्वाधिक कमाई केली आहे. रोहितने सर्वाधिक 178.6 कोटी जिंकेल आहेत.

रोहितनंतर आयपीएलच्या पगारातून सर्वाधिक कमाई करणारा दुसरा खेळाडू म्हणजे एमएस धोनी. चेन्नई सुपर किंग्जला धोनीने 4 वेळा विजेतेपद पटकावून दिलं आहे. धोनीने 176.84 कोटी कमवले आहेत.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहली आयपीएलच्या 15 व्या सीझनमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याने 173.2 कोटींची कमाई केली आहे. गेल्या वर्षी कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडले होते.

सुरेश रैनाने गेल्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. पण 2021 पर्यंत तो चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्व सीझनमध्ये सर्वाधिक मानधन मिळवणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. रवींद्र जडेजा हा चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो  तसंच तो राजस्थान रॉयल्स आणि कोची टस्कर्स केरळचाही भाग आहे. 2008 पासून जडेजाने पगारातून सुमारे 109 कोटी रुपये कमावले आहेत.

2012 मध्ये सुनील नरेनने कोलकाता नाइट रायडर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. विशेष म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील सर्व सिझनमध्ये सर्वाधिक मानधन मिळवणारा तो पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे.