Team India | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान मोठी घोषणा, टीम इंडिया आता ‘या’ संघाविरुद्ध खेळणार

| Updated on: Mar 17, 2023 | 7:25 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया 3 सामन्यांची वनडे सीरिज खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा मु्ंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरु आहे. या दरम्यान टीम इंडियासाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे.

Team India | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान मोठी घोषणा, टीम इंडिया आता या संघाविरुद्ध खेळणार
Follow us on

मुंबई | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. कसोटी आणि वनडे सीरिज असा ऑस्ट्रेलियाचा हा दौरा आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाकडून 2-1 ने पराभव स्वीकारावा लागला. आता त्यानंतर उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या वनडे सीरिजमधील पहिली मॅच ही मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडिया आता आगामी काही महिन्यात आणखी एका देशाचा दौरा करणार आहे.

टीम इंडियासाठी आगामी वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने 2023 हे वर्ष फार महत्वाचं आहे. त्यात आता टीम इंडिया एका देशाविरुद्ध खेळणार आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. ऑगस्ट 2023 मध्ये या मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसू शकतो. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने टीम इंडिया विरुद्ध टी 20 सारिज होणार असल्याचं जाहीर केलंय. या 3 सामन्यांच्या मालिकेचं आयोजन हे 18 ते 23 ऑगस्टदरम्यान करणयात येणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी आयर्लंडने बीसीसीआयचे आभार मानले आहे.

आयसीसीची ट्विटद्वारे माहिती

दरम्यान टीम इंडियाने याआधी गेल्या वर्षी 2022 मध्ये आयर्लंड दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यात टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 2 सामन्याची टी 20 मालिका खेळली होती. या सीरिजमध्ये हार्दिक पंड्या याने टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. टीम इंडियाने ही मालिका 2-0 अशी जिंकली होती.

दरम्यान आयर्लंड टीम इंडिया विरुद्धच्या सीरिजआधी बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. आयर्लंड विरुद्ध बांगालादेश यांच्यात 3 सामन्यांची वनडे सीरिज होणार आहे. ही सीरिज वनडे वर्ल्ड कपचा भाग असणार आहे. ही सीरिज 3-0 च्या फरकाने जिंकली, तर आयर्लंडने वर्ल्ड कपसाठी पात्र ठरेल. बांगलादेशने नुकतंच वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडचा टी 20 मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप करत सुपडा साफ केला आहे. त्यामुळे या मालिकेत आयर्लंडसमोर बांगलादेशचं मजबूत आव्हान असणार आहे.