AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियाला गोलंदाजीत नवा पर्याय! इरफान पठाणने अशी केली स्तुती

आयपीएल 2026 स्पर्धेतून काही खेळाडूंची चाचपणी केली जात आहे. कारण स्पर्धा संपल्यानंतर लगेचच वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने संघ बांधणी केली जाणार आहे. असं असताना इरफान पठाणने एका नावाची खूपच चर्चा केली आहे. बुमराह आणि शमीपेक्षा वेगळं टॅलेंट असल्याचं त्याने यावेळी अधोरेखित केलं.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियाला गोलंदाजीत नवा पर्याय! इरफान पठाणने अशी केली स्तुती
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियाला गोलंदाजीत नवा पर्याय! इरफान पठाणने अशी केली स्तुतीImage Credit source: PTI
| Updated on: Apr 03, 2026 | 6:04 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत नवोदीत खेळाडू आपली छाप सोडत आहेत. त्यामुळे भविष्यातील टीम इंडियाची बांधणी करण्यासाठी खेळाडू निवडणं सोपं होणार आहे. अशाच एका खेळाडूची चर्चा रंगली आहे. आयपीएल 2026 स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने 8.4 कोटी खर्च करून आकिब नबीला विकत घेतलं आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याला काही खेळण्याची संधी मिळाली नाही. तरी त्याचं कौतुक होत आहे. आकिब नबीने एका मुलाखतीत सांगितलं की, डेल स्टेनची गोलंदाजीचे व्हिडीओ पाहून काही धडे गिरवले आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने आकिब नबीचं कौतुक केलं आहे. इतकंच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीपेक्षा घातक गोलंदाज असल्याचं वर्णनही केलं आहे. त्याच्या गोलंदाजीतील खासियत त्याने अधोरेखित केली आहे. रणजी ट्रॉफीत आकिब नबीने सर्वाधिक 60 विकेट घेतले होता. त्याच्या गोलंदाजीचं कौतुक करताना पठाणने सांगितलं की, तो वनडे वर्ल्डकप 2027 मध्ये चांगली कामगिरी करू शकतो.

इरफान पठाणने पुढे सांगितलं की, ‘नबीकडे चेंडू उशिरा स्विंग करण्याची क्षमता आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यासह बहुतांश आंतरराष्ट्रीय गोलंदाजांची गोलंदाजीची करताना सीम पोझिशन सरळ असते. आकिब नबी थोडा वेगळा आहे. त्याचा वेग ताशी 140 पेक्षा जास्त नसतो, पण त्याचा चेंडू खेळपट्टीवरून वेगाने उसळतो. तो यष्टींच्या जवळून गोलंदाजी करतो, सातत्याने चेंडू बाहेरच्या बाजूला स्विंग करतो आणि मग अचानक आत आणतो, ज्यामुळे फलंदाज अडचणीत येतो.’

आकिब नबी कसा वेगळा आणि घातक गोलंदाज ठरतो?

इरफान पठाणने आकिब नबीचं कौतुक करताना आंतरराष्ट्रीय गोलंदाजांपेक्षा खूपच वेगळा असल्याचं सांगितलं. शमी आणि बुमराहपेक्षा त्याच्या गोलंदाजीत वेगळी गोष्ट आहे. त्याचं कौतुक करताना इरफान पठाण म्हणाला की, ‘मी वर्ष 2018 मध्ये पहिल्यांदा आकिब नबीला भेटलो होतो. तेव्हा मी जम्मू काश्मीर क्रिकेट संघाचा मेंटॉर होतो आणि आम्हाला 8-10 वेगवान गोलंदाजांचा चमू बांधायचा होता. त्यात आकिब नबी हा महत्त्वाचा गोलंदाज होता. त्याची खासियत म्हणजे तो खूप लांब स्पेल टाकतो. ज्युनियर क्रिकेट आणि अंडर 23 क्रिकेटमध्ये तो सलग गोलंदाजी करू शकत होता. ‘

Follow Us