AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजीव गोयंका-ऋषभ पंत वादावर LSG फ्रेंचायझीचं स्पष्टीकरण, Video पोस्ट केला तरी केलं जातंय ट्रोल

आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामना पार पडला. या सामन्यात लखनौचा दारूण पराभव झाला. त्यानंतर लखनौ फ्रेंचायझीचे मालक आणि कर्णधार पंतच्या चर्चेचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावर आता एलएसजी फ्रेंचायझीने स्पष्टीकरण दिलं आहे.

संजीव गोयंका-ऋषभ पंत वादावर LSG फ्रेंचायझीचं स्पष्टीकरण, Video पोस्ट केला तरी केलं जातंय ट्रोल
संजीव गोयंका-ऋषभ पंत वादावर LSG फ्रेंचायझीचं स्पष्टीकरण, Video पोस्ट केला तरी केलं जातंय ट्रोलImage Credit source: video grab
| Updated on: Apr 03, 2026 | 5:12 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीची बांधणी सुमार झाल्याची चर्चा क्रीडाप्रेमी आणि तज्ज्ञांमध्ये रंगली आहे. त्याचे परिणाम आता मैदानातही दिसू लागले आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा पहिल्याच सामन्यात दारूण पराभव झाला. 1 एप्रिलला लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौला 6 विकेट राखून मात दिली. या सामन्यातील पराभवानंतर संजीव गोयंका, कर्णधार ऋषभ पंत आणि हेड कोच जस्टीन लँगर यांचा चर्चेचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरून संजीव गोयंका नाराज असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. कारण या आधीही 2024 आयपीएल स्पर्धेत असाच वाद झाला होता. पराभवानंतर संजीव गोयंका कर्णधार केएल राहुलवर भडकले होते. त्यानंतर खूपच ट्रोल झाले होते. तसंच काहीसं घडलं असावा असा अंदाज बांधला जात आहे. त्यावर आता लखनौ सुपर जायंट्सने स्पष्टीकरण दिलं आहे.

लखनौ सुपर जायंट्सचं स्पष्टीकरण

आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने सामन्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोवर स्पष्टीकरण दिलं आहे. व्हायरल फोटोतून मांडली जाणारी थेअरी अर्धसत्य असल्याचं म्हंटलं आहे. यासाठी लखनौ सुपर जायंट्सने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सामन्यानंतर काय झालं? त्याबाबतचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओनुसार, सामना संपल्यानंतर ऋषभ पंत मैदानाबाहेर येतो. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या संजीव गोयंका यांची गळाभेट घेतो. तसेच प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्या चेहऱ्यावरही हसू असते. व्हिडीओ कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘प्रत्येक गोष्ट जी तुम्ही पाहता ती खरी नसते. हे सामन्यानंतरचे कोणतेही फिल्टर न लावलेले क्षण आहेत, जिथे कॅमेरे बंद होत नाहीत.’

व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा उलट तपासणी सुरू केली आहे. युझर्संनी या व्हिडीओवर कमेंट्स देण्यात सुरूवात केली आहे. एका युजर्सने लिहिलं की, ‘हे शूट करण्यासाठी त्यांनी पंतला हॉटेलच्या रूममधून परत बोलावले.’ असाच काहिशा प्रतिक्रिया इतर युजर्संनी नोंदवल्या आहेत.

लखनौ सुपर जायंट्सने पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्याची तयारी सुरू झाली आहे. दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना 5 एप्रिलला होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे लखनौ विजयासाठी खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा