AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy: रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात जम्मू काश्मीर रचणार इतिहास, चौथ्या दिवशी असं घडलं

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या जेतेपदाजवळ जम्मू काश्मीरचा संघ पोहोचला आहे. चार दिवसांचा खेळ संपला असून या सामन्यावर जम्मू काश्मीरने मजबूत पकड मिळवली आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी काय होणार याचा अंदाज क्रीडाप्रेमींनी आधीच लागला आहे.

Ranji Trophy: रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात जम्मू काश्मीर रचणार इतिहास, चौथ्या दिवशी असं घडलं
Ranji Trophy: रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात जम्मू काश्मीर रचणार इतिहास, चौथ्या दिवशी असं घडलंImage Credit source: BCCI/Viral Video Grab
| Updated on: Feb 27, 2026 | 6:27 PM
Share

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचा अंतिम सामना कर्नाटक आणि जम्मू काश्मीर यांच्यात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जम्मू काश्मीरच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला असंच चौथ्या दिवसानंतर म्हणावं लागेल. कारण या सामन्यावर पूर्णपणे पकड ही जम्मू काश्मीर संघाने मिळवली आहे. जम्मू काश्मीरने प्रथम फलंदाीज करताना सर्व गडी गमवून 584 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कर्नाटकच्या दिग्गज फलंदाजांनी नांगी टाकली. त्यामुळे सर्व गडा गमवून 293 धावांपर्यंत पोहोचले. यामुळे पहिल्या डावात जम्मू काश्मीरला 291 धावांची आघाडी मिळाली. या धावांच्या पुढे खेळताना जम्मू काश्मीरने चौथ्या दिवशी 4 विकेट गमवून 186 धावा केल्या. तसेच चौथ्या दिवसअखेर 477 धावा झाल्या आहेत. पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात जम्मू काश्मीर खेळला तर या सामन्यात जम्मू काश्मीरचा विजय पक्का होईल. कारण पहिल्या डावात जम्मू काश्मीरकडे आघाडी आहे. या आघाडीच्या जोरावर जम्मू काश्मीरला विजयी घोषित केलं जाईल.

दुसऱ्या डावात जम्मू काश्मीरची सुरूवात काही चांगली झाली नाही. संघाच्या 6 धावा असताना यावेर हस्सन 1 धाव करून तंबूत परतला. त्यानंतर पहिल्या डावात शतकी खेळी करणारा शुभम पुंडीर अवघ्या 4 धावांवर तंबूत परतला. पारस डोगरा 16 आणि अब्दुल समद 32 धावा करून बाद झाले. पण कामरान इकबालने एका बाजूने खिंड लढवणं सुरूच ठेवलं. त्यामुळे कर्नाटकचा पूर्णपणे बॅकफूटवर गेला.

जम्मू काश्मीरचा संघ पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. तसेच इतिहास रचण्याची संधी देखील चालून आली आहे. पाचव्या दिवशी जम्मू काश्मीर जेतेपद मिळवेल अशीच स्थिती आहे. त्यामुळे या विजयानंतर इतिहासात नोंद होईल. जम्मू काश्मीर एलिट डी गटात होता. या गटात दिल्ली, मुंबईसारखे दिग्गज संघ होते. असं असूनही या गटात टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यात जम्मू काश्मीरला यश आलं. उपांत्यपूर्व फेरीत जम्मू काश्मीरचा सामना मध्य प्रदेशशी झाला. या सामन्यात जम्मू काश्मीरने 56 धावांनी विजय मिळवला. तर उपांत्य फेरीत बंगालला 6 विकेट्स राखून पराभूत केलं.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!