IPL 2024 | 20 वर्षांचं पोरगं, आज जगात नंबर वन बॉलर, MIचा लकी चार्म आणि यॉर्कर किंग बुमराहचा यशस्वी प्रवास

| Updated on: Mar 19, 2024 | 7:06 PM

Yorker King Jasprit Bumrah IPL Journey : टीम इंडियाचा हुकमी एक्का असलेला जसप्रीत बुमराह आयपीएलसाठी तयार आहे. मुंबईमध्ये आलेल्या 20 वर्षाचं पोरगं आज जगातील नंबर वनचा गोलंदाज आहे. बुमराहचा आयपीएलपर्यंचा यशस्वी प्रवास कसा होता जाणून घ्या.

IPL 2024 | 20 वर्षांचं पोरगं, आज जगात नंबर वन बॉलर, MIचा लकी चार्म आणि यॉर्कर किंग बुमराहचा यशस्वी प्रवास
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आणि सर्व क्रिकेट फॉरमॅटमधील जगात नंबर वनचा गोलंदाज जसप्रीत बुमराह येत्या हंगामासाठी तयार आहे.  2013 मध्ये अवघ्या दहा लाखांना खरेदी केलेला खेळाडू आता करोडो रूपये घेत आहे. आपल्या खतरनाक बॉलिंग प्रदर्शनाच्या जोरावर त्याने जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीये. बुमराहशिवाय आता मुंबई इंडियन्सची टीम अपूर्ण वाटते. बुमराहने आतापर्यंत फक्त मुंबई इंडियन्स संघाकडूनच खेळलाय. जसप्रीत बुमराहचा आयपीएलमधील प्रवास आणि रेकॉर्ड जाणून घ्या.

जसप्रीत बुमराह आयपीएल डेब्यू

6 डिसेंबर 1993 मध्ये यॉर्कर किंगचा अहमदाबादमध्ये त्याचा जन्म झाला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये यॉर्कर किंगने आपली छाप पाडली होती. त्यानंतर बुमराहला 2013 च्या लिलावामध्ये पलटणने 10 लाखांना विकत घेतलं. मुंबईन त्याला आपल्या ताफ्यात घेतलं खरं पण अवघे दोन सामने खेळण्याची संधी मिळाली होती. आपल्या डेब्यू सामन्यात त्याने विराट कोहलीची विकेट घेतली होती, त्यासोबतच त्याने मयंक अग्रवाल आणि करून नायर या दोघांना आऊट केलं होतं. त्यावेळी मुंबईकडे लसिथ मलिंगा, मुनाफ पटेल, मिचेल जॉन्सनसारखे तगडे गोलंदाज होते. टीम मॅनेजमेंटने त्याला रीलीज केलं होतं. मात्र 2014 च्या लिलावामध्ये मुंबईने त्याला परत 1 कोटी 20 लाखांना खरेदी करत आपल्या ताफ्यात माघारी घेतलं होतं.

यॉर्कर किंगला MI आतापर्यंत नाही केले रीलीज

जसप्रीत बुमराह याला 2014नंतर मुंबईने कधीही रीलीज केलं नाही. आता जवळपास दहा वर्ष होतील बुमराह मुंबई संघाचा मेन गोलंदाज आहे. बुमराह ज्या वर्षी टीममध्ये आला त्याच वर्षी मुंबईने आयपीएलचं पहिले विजेतेपद जिंकलं होतं. रोहित शर्माकडे त्यावेळी टीमची धुरा सोपवण्यात आली होती. डेथ ओव्हर्समध्येही शानदार बॉलिंग आणि घातक यॉर्कर बुमराहची ओळख झाली आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद जिंकले आहेत. या सर्व सीझनमध्ये बुमराहनेही टीममध्ये गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. बुमराहला 2022, 2023 आणि 2024 मुंबई मॅनेजमेंट १२ कोटी देत टीममध्ये ठेवत आहे.

बुमराहची आयपीएलमधील कामगिरी

जसप्रीत बुमराहने 120 सामने खेळले असून 56 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 16आहे. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला आहे. तर बॉलिंगमध्ये 23.31 च्या सरासरीने त्याने 145 विकेट घेतल्या आहेत. 5/10 ही बेस्ट कामगिरी राहिली आहे. पाच विकेट घेण्याची कामगिरी एकदा केली आहे.

बुमराहने आयपीएलमध्ये केलेल्या प्रदर्शनानंतर त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याने निवड समितीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. बुमराह हा एकमेव गोलंदाज आहे ज्याने साऊथ आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाचपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. बुमराहची तुलना वकार युनूस, कागिसो रबाडा, शोएब अख्तर आणि लसिथ मलिंगा यांसारख्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांशी केली जाते.

मुंबई इंडियन्स आयपीएल फायनल संंघ 2024:- रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड , रोमा, रोहित ब्रेव्हिस. हार्दिक पांड्या (C), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.