AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Perry Saree Dance Video | आरसीबीमधील पेरीने पार्टीत साडी नेसत लगावले ठुमके, व्हिडीओ तुफान व्हायरल

Ellyse Perry saree dance Video : ऑस्ट्रेलियाची 33 वर्षीय ऑल राऊंडर खेळाडू एलिसा पेरीने भारतात येत हवा केली आहे. वुमन्स प्रीमियर लीगमध्येही ऑरेंज कॅप जिंकत तिने आरसीबीला ट्रॉफी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर पेरीचा साडीतील डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Perry Saree Dance Video | आरसीबीमधील पेरीने पार्टीत साडी नेसत लगावले ठुमके, व्हिडीओ तुफान व्हायरल
Ellyse Perry saree dance Video RCB Party
| Updated on: Mar 19, 2024 | 2:58 PM
Share

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 मधील दुसऱ्या पर्वामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपदावर नाव कोरलं. आरसीबी संघाने फायनल सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव करत हा विजय नोंदवला. आरसीबी फ्रंचायसीने या ट्रॉफीसाठी सतरा वर्ष वाट पाहिली. मेन्स टीमला अजून ही कामगिरी करता आली नाही. एकदा दोनदा नाहीतर तीनवेळा फायनल गाठणाऱ्या आरसीबी संघाला एकदा ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मात्र वुमन्स टीमने दुसऱ्याच सीझनमध्ये ट्रॉफीवर नाव कोरलं.  आरसीबी वुमन्स संघासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये  एलिस पेरीने सर्वात जास्त लक्ष वेधलं. साडीमधील डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या पार्टीमध्ये आरसीबी टीमच्या सर्व खेळाडू वेगवेगळ्या लूकमध्या पाहायला मिळाल्या. एलिसा पेरीने नेसलेल्या काळ्या रंगाच्या साडीमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुललं होतं. पेरीने साडीवरच डान्स केला, तिच्या डान्यचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पाहा व्हिडीओ-:

एलिसा पेरीची भारतामध्ये चर्चा होत आहे. एलिसा पेरीने आरसीबीला ट्रॉफी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यंदाच्या सीझनमध्ये पेरीने सर्वाधिक 347 धावा काढत ऑरेंज कॅप जिंकली. त्यासोबतच पेरीने बॉलिंगमध्येही आपली छाप सोडली. मुंबईविरूद्धच्या सामन्यात एकटी पेरी भारी पडली, संघ अडचणीत असताना केलेली अर्धशतकी खेळी आणि त्यानंतर बॉलिंगमध्ये एकटीने मुंबईच्या संघाला खिंडार पाडलं होतं.

दरम्यान, एलिस पेरी भारतात येण्याआधीपासूनच तिची चर्चा होती. अखेर पेरीने शेवटच्या सत्रात भारतातही आपली छाप पाडली. प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात पेरीने आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. विजेतेपद जिंकल्यावर आता पेरीच्या साडीची चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.