रोहित शर्माच्या जर्सीसाठी जोस बटलरची खास इंस्टाग्राम स्टोरी, काय म्हणाला?
क्रिकेटविश्वात अनेक दिग्गज खेळाडूंच्या कथा ऐकिवात आहेत. क्रिकेटच्या मैदानात कितीही द्वंद्व असलं तरी मैदानाबाहेर तितकेच मित्रही आहेत. अशीच एक कहाणी रोहित शर्मा आणि जो बटलरची आहे. या कथेला जोस बटलरच्या इंस्टाग्राम स्टोरी ठेवून पुन्हा एकदा मुलामा दिला आहे.

भारतीय संघाचा हिटमॅन आणि इंग्लंडचा जोस बटलर क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. आतापर्यंत या दोघांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रोहित शर्मा आणि जोस बटलर आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी एकत्र खेळलेही आहेत. असं असताना रोहित शर्माने जोस बटलरला दिलेल्या जर्सीची कहाणी आता चर्चेत आहे. भारत आणि इंग्लंड वनडे मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने शतक ठोकलं होतं. लॉर्ड्सवरील ऐतिहासिक सामन्यात रोहित शर्माने 110 चेंडूत 138 धावा केल्या. हा सामना भारताने गमावला, पण या सामन्यानंतर लॉर्ड्स मैदान एका घटनेचा साक्षीदार ठरला. रोहित शर्माने स्वत:च्या जर्सीवर एक खास संदेश लिहून जोस बटलरला गिफ्ट केली. पण त्या मागचीही रंजक कहाणी आहे.
रोहित शर्माने जर्सीवर लिहिलं की, प्रिय जोस, तुझ्यासोबत आणि तुझ्याविरुद्ध खेळण्याचा काळ मला नेहमीच आवडला. त्यानंतर ही जर्सी जोस बटलरने इंस्टा स्टोरीत पोस्ट करत एक खास संदेश दिला आहे. विरोधी संघातील अशा एकमेव खेळाडूचा टी-शर्ट आहे जो मला नेहमीच हवा होता. रोहित शर्मा माझा ऑल-टाइम फेवरेट खेळाडूंपैकी एक आहे. मी ही भेट नेहमीच एका अमूल्य ठेव्यासारखी जपून ठेवेन.

कशी मिळाली होती जोस बटलरला जर्सी?
रोहित शर्माने जोस बटलरला सही केलेली जर्सी स्वतःहून दिली नव्हती, तर जोस बटलरने स्वतःहून मागून घेतली होती. जोस बटलरने एका मुलाखतीत याबाबतचा किस्सा सांगितला होता. तेव्हा जोस बटलर म्हणाला होता की, मला बऱ्याच वर्षांपासून रोहित शर्माची जर्सी हवी होती. सामना संपल्यानंतर मी लॉर्ड्सच्या लाँग रूमध्ये गेलो. तेव्हा रोहित एका महत्त्वाच्या कॉलमध्ये व्यस्त होता. पण तरीही धाडस करून त्याच्याकडे जर्सी मागितली. तेव्हा रोहितने मोठेपणा दाखवत लगेच फोन बाजूला ठेवला आणि बटलरला सॉरी म्हंटलं. इतकंच काय तर तात्काळ वर जाऊन जर्सी आणि आणि स्वाक्षरी करून दिली. जोस बटलकरकडे जगातील सर्वच दिग्गज क्रिकेटपटूंच्या स्वाक्षरी केलेल्या जर्सींचे कलेक्शन आहे. पण त्याच्याकडे रोहितची जर्सी नव्हती. आता त्या कलेक्शनमध्ये रोहितच्या जर्सीची भर पडली आहे.
