AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खूप साऱ्या गोष्टी बदलल्या आहेत, मी कॅप्टन होतो पण आता..’, रोहित शर्मा मनातलं बोलून गेला

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच रोहित शर्माच्या गळ्यातील कर्णधारपदाची माळ काढून हार्दिक पांड्याच्या गळ्यात घातली. त्यानंतर बरीच उलथापालथ झाली. मुंबई इंडियन्सची कामगिरी काही खास झाली नाही. यंदाच्या पर्वातही सुरुवात चांगली झाली नाही, पण तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. यानंतर रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'खूप साऱ्या गोष्टी बदलल्या आहेत, मी कॅप्टन होतो पण आता..',  रोहित शर्मा मनातलं बोलून गेला
रोहित शर्मा मुंबई इंडियन्स
| Updated on: Apr 02, 2025 | 4:57 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स ही सर्वात यशस्वी फ्रेंचायझी आहे. आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वात पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण मागच्या काही वर्षात दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही हवा तसा रिझल्ट मिळालेला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडून काढून ती हार्दिक पांड्याच्या हाती सोपवली आहे. रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेतील आतापर्यचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. पण त्याला आता सर्वच जबाबदारीतून मोकळं केलं आहे. सध्या संघात त्याची जागा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून दिसत आहे. यानंतर रोहित शर्माने आपलं मन मोकळं केलं आहे. या स्पर्धेतील तीन सामन्यात मुंबई इंडियन्सची कामगिरी काही खास झाली नाही. पहिल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात होमग्राउंड वानखेडेवर कोलकात्याला पराभूत केलं आहे. पण या सामन्यातही रोहित शर्मा इम्पॅक्ट पाडू शकला नाही.

रोहित शर्माने जिओस्टारशी बोलताना सांगितलं की, ‘मी जेव्हापासून सुरु केलं आहे तेव्हापासून बरंच काही बदललं आहे. मी तेव्हा मधल्या फळीत फलंदाजीला यायचो आणि आता ओपनिंग करतो. मी कॅप्टन होतो आणि आता नाही. आमच्या चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या हंगामातील माझे काही सहकारी आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. म्हणून, भूमिका बदलल्या आहेत, बरेच काही बदलले आहे, परंतु मानसिकता तीच आहे. या संघासाठी मी जे करू इच्छितो ते बदललेले नाही आणि ते म्हणजे तिथे जाऊन सामने आणि ट्रॉफी जिंकणे. मुंबई इंडियन्स त्यासाठीच ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत, आम्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि ज्या परिस्थितीत कोणीही विश्वास ठेवत नव्हते अशा परिस्थितीतून सामने वळवले आहेत. मुंबई इंडियन्स त्यासाठी ओळखली जाते.’

“संघात ट्रेंट बोल्टसारखे अनुभवी खेळाडू आहेत. ते मुंबई इंडियन्सची संस्कृती समजून घेतात. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर आहे,त्याच्याकडेही अनुभव आहे. विल जॅक्स आणि रीस टॉपलीसारखे खेळाडू चांगले खेळाडू आहेत.तर रायन रिकेल्टन हा एक रोमांचक तरुण खेळाडू आहे. या प्रत्येक खेळाडूत काहीतरी वेगळेपणा आहे आणि त्याचा मोठा प्रभाव पडतो. आमच्याकडे अनेक तरुण भारतीय खेळाडू आहेत ज्यांची क्षमता मोठी आहे आणि मी त्यांच्यासोबत खेळण्यास उत्सुक आहे. माझे ध्येय आयपीएल ट्रॉफी जिंकणे आणि मुंबई इंडियन्सला पुन्हा वैभव मिळवून देणे आहे.”, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा