IPL 2022 Orange Cap Winner: अखेर Jos Buttler ने मिळवली आयपीएलमधील मानाची Orange Cap

| Updated on: May 29, 2022 | 10:29 PM

IPL 2022 Final Orange Cap Holder: प्लेऑफमध्ये दाखल झाल्यानंतर त्याने आधी गुजरात टायन्स विरुद्ध 89, त्यानंतर RCB विरुद्ध नाबाद 106 धावांची शतकी खेळी केली आणि आज धावा केल्या. आपण मोठ्या मॅचचा खेळाडू असल्याचं त्याने आपल्या फलंदाजीतून दाखवून दिलं.

IPL 2022 Orange Cap Winner: अखेर Jos Buttler ने मिळवली आयपीएलमधील मानाची Orange Cap
jos Buttler orange cap
Follow us on

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीग (IPL) स्पर्धेतला यंदाच्या सीजनमधला आज शेवटचा सामना खेळला गेला. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन संघांमध्ये फायनल सुरु आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ही फायनल लढत आहे. आयपीएल स्पर्धेत कुठला संघ चॅम्पियन ठरणार? त्या बरोबरच ऑरेंज कॅप, पर्पल कॅप कोणत्या खेळाडूला मिळणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असते. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा इंग्लंडचा क्रिकेटपटू जोस बटलर (Jos buttler) ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याने आयपीएलच्या 15 व्या सीजनमध्ये सर्वाधिक धावा केल्या. आपल्या फलंदाजीने त्याने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. बटलर प्रत्येक सामन्यात टी-20 ला साजेसं क्रिकेट खेळला. पण त्याचे कुठलेही फटके आडवे-तिडवे नव्हते. परफेक्ट क्रिकेटिंग शॉट्स तो खेळला. बटलरने या सीजनमध्येचार शतकांसह तब्बल धावा केल्या.

प्लेऑफमध्ये बटलर कसा खेळला?

प्लेऑफमध्ये दाखल झाल्यानंतर त्याने आधी गुजरात टायन्स विरुद्ध 89, त्यानंतर RCB विरुद्ध नाबाद 106 धावांची शतकी खेळी केली आणि आज 39 धावा केल्या. आपण मोठ्या मॅचचा खेळाडू असल्याचं त्याने आपल्या फलंदाजीतून दाखवून दिलं.

डेविड वॉर्नरला मागे टाकलं

बटलरने या सीजनमध्ये 17 सामन्यात 57.53 च्या सरासरीने एकूण 863 धावा केल्या. आजच्या सामन्यात जोस बटलरने एक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला. त्याने सर्वाधिक धावा बनवण्याच्या बाबतीत डेविड वॉर्नरला मागे टाकलं. वॉर्नरने 2016 मध्ये 848 धावा केल्या होत्या. बटलर आता पुढे निघून गेला आहे, तो आता दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या नावावर एका सीजनमध्ये 973 धावा आहेत. बटलरचा 149.05 चा स्ट्राइक रेट आहे. बटलरने चार शतकं आणि चार अर्धशतक झळकावली.

एका सीजनमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम विराटच्या नावावर

जोस बटलरने या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघांविरुद्ध शतक झळकावली. आयपीएलच्या एका सीजनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 2016 च्या सीजनमध्ये सर्वाधिक 973 धावा केल्या होत्या. त्यामध्ये चार शतकं होती, त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची टीम फायनलमध्ये पोहोचली होती.

बटलरच्या ऑरेंज कॅपला धोका नव्हता

आजच्या अंतिम सामन्यात जोस बटलरच्या आसपासही कोणी पोहोचण्याची शक्यता नव्हती. कारण फायनलआधीच त्याच्या 824 धावा झाल्या होत्या. केएल राहुल या सीजनमध्ये 616 धावा फटकावल्या. पण एलिमिनेटरमध्येच लखनौचं आव्हान संपुष्टात आलं. क्विंटन डि कॉक ने 508 धावा केल्या. तो तिसऱ्या स्थानावर आहे. तो सुद्धा लखनौकडून खेळतो. RCB चा कॅप्टन फाफ डू प्लेसिसने 468 धावा केल्या. त्या संघाचं आव्हान क्वालिफायरमध्ये दोन मध्ये संपुष्टात आलं. शिखर धवनने 460 धावा केल्या. पण पंजाब किंग्सचं आव्हान लीग फेरीतच संपुष्टात आलं. त्यामुळे जोस बटलरच्या ऑरेंज कॅपला तसा धोका नव्हता.