
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात रांचीमध्ये चौथा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. भारताच्या 34 वर्षीय क्रिकेटपटूचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. या भारतीय खेळाडूच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर एकच शोककळा पसरली आहे. तसेच वयाच्या 34 वर्षी अकाळी निधनाने खळबळही उडाली आहे.
कर्नाटकाचा माजी क्रिकेटर के होयसला याचं हृद्य विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. मैदानात टीमच्या विजयाचा जल्लोष करताना के होयसलाच्या छातीत दुखु लागलं. त्यामुळे होयलाचा निधन झालं. हा सर्व प्रकार एजिस साऊथ झोन स्पर्धेतील एका सामन्यानंतर घडला. हा सामना बंगळुरूतील आरएसआय क्रिकेट ग्राउंडवर पार पडला. या सामन्यात कर्नाटक विरुद्ध तामिळनाडू आमनेसामने होते. कर्नाटकाने हा सामान जिंकला. आता नेहमीप्रमाणे विजयानंतर खेळाडूंकडून जल्लोष करण्यात आला. यात होयसलाही होता.
होयसलला छातीत त्रास जाणवू लागला. तो मैदानात बेशुद्ध झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. हा सर्व प्रकार 22 फेब्रुवारीला घडला. तर 23 फेब्रुवारीला सर्व प्रकार जगजाहीर झाला.
के होयस याचं निधन
Young cricketer from Karnataka, Hoysala K collapsed and died due to cardiac arrest during the post match huddle in Bangalore yesterday. He had represented KA junior Ranji team in the past and currently a star player in KPL. Quite unfortunate. pic.twitter.com/c1iJBp8NTv
— Pradeep A J (@pradeepaj) February 23, 2024
के होयसला ऑलराउंडर होता. होयसला मधल्या फळीत बॅटिंग करायचा. होयसला वेगवान गोलंदाज होता. होयसलाने अंडर 25 कर्नाटकचं प्रतिनिधित्व केलं. तसेच कर्नाटक प्रीमियर लीगमध्येही तो सहभागी झाला होता.
दरम्यान होयसला याच्या निधनावर कर्नाटकाचे मंत्री दिनेश गुंडू यांनी सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केला. “होयसलाच्या निधनाचं वृत्त समजलं. फार वाईट वाटलं. कुटुंबियांना या धक्क्यातून सावरण्याची ताकद मिळो. मी त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रांच्या पाठीशी आहे.”, असं गुंडू यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.