केविन पीटरसनने 22 गोलंदाजांची नावं लिहून आजच्या क्रिकेटर्संना दिलं खुलं आव्हान, राग मानू नका पण…

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरु आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने सध्याच्या क्रिकेटयुगात फलंदाजी करणं सोपं असल्याचं सांगितलं आहे. यासाठी त्याने 22 गोलंदाजांनी नावं समोर ठेवली आहेत.

केविन पीटरसनने 22 गोलंदाजांची नावं लिहून आजच्या क्रिकेटर्संना दिलं खुलं आव्हान, राग मानू नका पण...
केविन पीटरसनने 22 गोलंदाजांची नावं लिहून आजच्या क्रिकेटर्संना दिलं खुलं आव्हान, राग मानू नका पण...
Image Credit source: File Photo
| Updated on: Jul 26, 2025 | 8:22 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2025-2027 स्पर्धेत भारताची सुरुवात काही चांगली झालेली नाही. भारताने आतापर्यंत खेळलेल्या तीन पैकी 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चौथा कसोटी सामनाही पराभवाच्या सावटाखाली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना इंग्लंडने जिंकला तर मालिका पराभव सहन करावा लागेल. असं असताना इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने कसोटी फलंदाजीबाबत एक मत व्यक्त केलं आहे. आधीच्या तुलनेत कसोटीत फलंदाजी करणं सोपं असल्याचं सांगितलं आहे. आजचल्या तुलनेनं 20-25 वर्षांपूर्वी फलंदाजी करणं दुपटीने कठीण होतं. त्या काोळात वसीम अक्रम, शोएब अख्तर, अनिल कुंबले, शेन वॉर्न, मुथैया मुरलीधरन यासारखे दिग्गज गोलंदाजी होते. त्याचा सामना करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं, असं केविन पीटरसन याने सांगितलं. याबाबत त्याने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

‘माझ्यावर रागवू नका, पण आजच्या तुलनेत 20-25 वर्षांपूर्वी फलंदाजी करणं कठीण होतं. तेव्हा वकार, शोएब, अक्रम, मुश्ताक, कुंबळे, श्रीनाथ, हरभजन, डोनाल्ड, पोलॉक, क्लुजनर, गॉफ, मॅकग्रा, ली, वॉर्न, गिलेस्पी, बाँड, व्हेटोरी, केर्न्स, वास, मुरली, कर्टली, कोर्टनी आणि यादी अशीच चालू राहू शकते यासारखे गोलंदाज होते. मी 22 नावं घेतली. आजच्या काळात अशा 10 गोलंदाजांची नावं सांगा की जी यांचा सामना करू शकतील.’

केविन पीटरसनने कसोटीत आक्रमक खेळी करणाऱ्या बेजबॉल शैलीचाही उल्लेख केला. यात फलंदाज वेगवान धावा करत आहे. याचा उल्लेख करत सांगितलं की, आजकाल खेळपट्ट्या देखील फलंदाजांना अनुकूल होत आहेत. तसेच गोलंदाजांच्या गोलंदाजीला पहिल्यासारखी धार नाही. दरम्यान, भारत इंग्लंड कसोटी मालिकेच्या चौथ्या दिवशी भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताचे दोन खेळाडू खातं न खोलताच तंबूत परतले. त्यामुळे पराभवाचं तोंड पाहावं लागू शकतं.