IND vs BAN: दुसऱ्या कसोटीसाठी Rohit Sharma टीममध्ये परतणार, टीम इंडियातील ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात

IND vs BAN: चटोग्राम टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा एक खेळाडू सलग दुसऱ्याडावात फ्लॉप ठरला. दोन्ही इनिंग्समध्ये मिळूनही तो 50 धावा नाही करू शकला.

IND vs BAN: दुसऱ्या कसोटीसाठी Rohit Sharma टीममध्ये परतणार, टीम इंडियातील या खेळाडूची जागा धोक्यात
team india
Image Credit source: twitter
| Updated on: Dec 16, 2022 | 6:31 PM

ढाका: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा एक खेळाडू पूर्णपणे फ्लॉप आहे. आधी पहिल्या डावात आणि त्यानंतर दुसऱ्याडावात हा खेळाडू छाप उमटवण्यात अपयशी ठरला. पुढच्या सामन्यासाठी निश्चित या खेळाडूच टेन्शन वाढणार आहे. दुसऱ्या टेस्टसाठी कॅप्टन रोहित शर्मा टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे या खेळाडूची बॅटिंग पोजिशन बदलू शकते.

चटोग्राम टेस्टमध्ये हा खेळाडू पूर्णपणे फ्लॉप

पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल टीमच नेतृत्व करतोय. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीमने आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय. पण फलंदाज म्हणून तो अपयशी ठरलाय. केएल राहुल या सामन्यात दोन इनिंगमध्ये मिळूनही 50 धावा करु शकला नाही.

खराब प्रदर्शनाची किंमत चुकवावी लागेल

केएल राहुलने या कसोटीच्या पहिल्या डावात 54 चेंडूंचा सामना करताना 22 धावा केल्या. तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. पहिल्या डावात खालिद अहमदने विकेट काढली. दुसऱ्याडावात राहुलने 62 चेंडूंचा सामना केला. त्याने 23 रन्स केल्या. पण पुन्हा एकदा तो स्वस्तात बाद झाला. दुसऱ्याडावात खालिद अहमदने त्याला आऊट केलं.

रोहित परतल्याने टेन्शन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी तयार आहे. रोहित खेळला, तर दुसऱ्या कसोटीत प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल पहायला मिळू शकतात. चालू कसोटीत केएल राहुल आणि शुभमन गिलने सलामीवीराची भूमिका बजावलीय. रोहित टीममध्ये परतल्यानंतर एकाला बाहेर बसाव लागेल. शुभमन गिलने आज शतक ठोकून आपली दावेदारी मजबूत केलीय.