IND vs SA: पहिल्या वनडे सामन्यातील प्लेइंग 11 बाबत केएल राहुलचं मोठं विधान, पंत-ऋतुराज खेळणार की नाही?

शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने वनडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर पडली आहे. त्यामुळे कोणत्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार याबाबत उत्सुकता आहे. असं असताना सामन्याच्या एक दिवस आधी त्याने याबाबत खुलासा केला आहे.

IND vs SA: पहिल्या वनडे सामन्यातील प्लेइंग 11 बाबत केएल राहुलचं मोठं विधान, पंत-ऋतुराज खेळणार की नाही?
IND vs SA: पहिल्या वनडे सामन्यातील प्लेइंग 11 बाबत केएल राहुलचं मोठं विधान, पंत-ऋतुराज खेळणार की नाही?
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 29, 2025 | 3:59 PM

भारत दक्षिण अफ्रिका कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ आता वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 30 नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण अफ्रिका भिडणार आहेत. शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने या मालिकेत कर्णधारपदाची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे प्लेइंग 11 कशी असणार याबाबत उत्सुकता आहे. केएल राहुलने मालिका सुरु होण्यापूर्वी प्लेइंग 11 बाबत मोठी घोषणा केली आहे. केएल राहुल या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी केएल राहुलने प्लेइंग 11 मध्ये कोण कोणत्या स्थानावर फलंदाजी करेल याबाबत सांगितलं. केएल राहुल रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत म्हणाला की, राहुल म्हणाला, “कधीही या दोघांचेही महत्त्व खूप मोठे आहे. संघात वरिष्ठ खेळाडू असल्याने ड्रेसिंग रूमला अधिक आत्मविश्वास मिळतो. ते येथे आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे.

भारताचा कर्णधार केएल राहुलने सांगितलं की, संपूर्ण मालिकेत मधल्या फळीत फलंदाजी करेल. ‘मी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेन.’, असं केएल राहुल म्हणाला. रवींद्र जडेजाच्या कमबॅकबाबतही त्याने आपलं मन मोकळं केलं. “जड्डूने भारतासाठी वारंवार चांगली कामगिरी केली आहे. त्याचा अनुभव आमच्यासाठी खूप मोठा आहे.”, असं केएल राहुल म्हणाला. त्यानंतर ऋषभ पंत आणि ऋतुराज गायकवाड यांच्याबाबत प्रश्न विचारला गेला. ऋषभ पंत चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीममध्ये परतला आहे. तर ऋतुराज गायकवाड जवळपास 2 वर्षांनी या फॉर्मेटमध्ये कमबॅक करत आहे. पण या दोघांना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल का? असा प्रश्न विचारला गेला.

कर्णधार केएल राहुलने सांगितलं की, ‘तुम्ही प्रत्येकाने पाहिलं आहे की पंत संघात कोणत्या प्रतिभेसह उतरतो. तो फक्त फलंदाज म्हणून खेळण्यास सक्षम आहे. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केले तर विकेटकीपिंग ग्लोव्हजही सांभाळेल.’ ऋतुराज गायकवाडबाबत म्हणाला की, “ऋतुराज गायकवाड हा एक उत्तम खेळाडू आहे. आमच्या टॉप 5-6 वनडे संघाची रचना अशी आहे की ती खूप स्थिर आहे. परंतु त्याला मिळालेल्या मर्यादित संधींमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. आम्ही त्याला या मालिकेत संधी देण्याचा विचार करत आहोत.”