संजू सॅमसनला द्यावा लागणार तीन परीक्षा, तेव्हाच येता येणार मुंबईत! सूर्यकुमारने दिला असा सल्ला

संजू सॅमसनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच मुंबईत येऊ शकतो का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. यावर कर्णधार सूर्यकुमार यादवने उत्तर देत सांगितलं की, हो नक्कीच.. पण तीन ऑडिशन दिल्यानंतरच हे शक्य आहे. जाणून घ्या यामागचं कारण

संजू सॅमसनला द्यावा लागणार तीन परीक्षा, तेव्हाच येता येणार मुंबईत! सूर्यकुमारने दिला असा सल्ला
| Updated on: Jan 21, 2025 | 4:44 PM

टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका बुधवारपासून खेळणार आहे. भारताचा पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. संजू सॅमसन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याने सलग दोन शतक ठोकत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. यासह त्याने टीम इंडियात आपली जागाही पक्की केली आहे. कोलकात्यात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल यात काही शंका नाही. पण संजू सॅमसनच्या सोशल मिडिया पोस्टमुळे सध्या चर्चेत आला आहे. यात संजू सॅमसनने मुंबईत येऊ शकतो का? असा प्रश्न विचारला आहे. पण यासाठी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एक अट ठेवली आहे. यासाठी संजू सॅमसनला तीन ऑडिशन द्यावे लागणार आहेत. नेमके हे तीन ऑडिशनचा प्रकार काय आहे? ते समजून घेऊयात..

संजू सॅमसनने अभिषेक नायरसोबत आमिर खानच्या जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील पहला नशा हे गाणं गात असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. तसेच हे गाणं पोस्ट करताना संजू सॅमसनने लिहिलं की, काहीच अशक्य नाही. तसेच प्रश्नचिन्ह वापरून मुंबईत येऊ शकतो का? असा प्रश्न विचारला आहे. संजू सॅमसनच्या या प्रश्नावर कर्णधार सूर्यकुमार यादव व्यक्त झाला आहे. रिप्लाय देताना म्हणाला की, नक्कीच येऊ शकतो पण 3 ऑडिशननंतर. सूर्यकुमार यादवने लिहिलं की, तू मुंबईत येणार आहेस, पण चेन्नई, राजकोट, पुणे ऑडिशननंतर..

सूर्यकुमारने यादवने चेन्नई, राजकोट आणि पुणे ऑडिशनचा अर्थ हा टी20 मालिकेशी निगडीत आहे. टीम इंडिया पहिला सामना कोलकात्यात खेळणार आहे. त्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे चेन्नई, राजकोट आणि पुण्यात खेळणार आहे. तसेच या मालिकेतील शेवटचा सामना मुंबईत होणार आहे. सूर्यकुमारच्या मते, संजू मुंबईत येईल पण चेन्नई, राजकोट आणि पुण्यात आक्रमक फलंदाजी करून.. संजू सॅमसन गेल्या काही सामन्यात टीमच्या आत बाहेर राहिला आहे. मात्र या मालिकेत चांगली कामगिरी करून संघात स्थान पक्कं करण्याची संधी आहे.